लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जोपासना योजनेंगर्तत प्रदान केलेली बाल अतिदक्षता रुग्णवाहिका सद्यस्थितीत धूळखात उभी आहे. मेळघाटातील कुपोषण आणि बालमृत्यू बघता, उद्धव ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी ही रुग्णवाहिका मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला दिली. मात्र, या रुग्णवाहिकेकडे वन्यजीव विभागाने दुर्लक्ष केले आहे.एमएच २७/सी ५७४३ क्रमांकाची ही टाटा सुमो जोपासना योजनेंतर्गत प्रदान करण्यात आली. मेळघाट वन्यजीव विभागाच्या परतवाडा येथील विभागीय कार्यालयाच्या आवारात ती दीड वर्षापासून उभी आहे. वाहनाची बॉडी चांगल्या स्थितीत असली तरी तिचे टायर खराब झाले आहेत. ही रुग्णवाहिका दुरुस्त करायला वन्यजीव विभागाकडे वेळ नसल्याचे एकंदर स्थितीवरून निदर्शनास येत आहे. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री बनताच ही धूळखात उभी असलेली रुग्णवाहिका चर्चेत आली आहे. मेळघाटात अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी हे वाहन सुस्थितीत आणावे, अशी मागणी होत आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची रुग्णवाहिका दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST
एमएच २७/सी ५७४३ क्रमांकाची ही टाटा सुमो जोपासना योजनेंतर्गत प्रदान करण्यात आली. मेळघाट वन्यजीव विभागाच्या परतवाडा येथील विभागीय कार्यालयाच्या आवारात ती दीड वर्षापासून उभी आहे. वाहनाची बॉडी चांगल्या स्थितीत असली तरी तिचे टायर खराब झाले आहेत. ही रुग्णवाहिका दुरुस्त करायला वन्यजीव विभागाकडे वेळ नसल्याचे एकंदर स्थितीवरून निदर्शनास येत आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची रुग्णवाहिका दुर्लक्षित
ठळक मुद्देवन्यजीव विभागाचे दुर्लक्ष : जोपासना योजनेंतर्गत दिले वाहन