वरूड : सभापती विक्रम ठाकरे मित्र परिवाराद्वारे १० मेपासून कोविड हेल्पलाईन या नवोपक्रमास सुरुवात झाली तसेच वरूड तालुक्यातील कोविड रुग्णांसाठी ॲम्ब्युलन्स सुविधेचे लोकार्पण माजी सैनिक गणेश गावंडे, माजी सैनिक नंदू काळे व आयएमए वरूडचे अध्यक्ष राजेंद्र राजोरिया यांच्या हस्ते करण्यात आले. कॉंग्रेस सेवादलचे तालुकाध्यक्ष नरेंद्र पावडे, नगरसेवक धनंजय बोकडे, किशोर तडस, मनोज इंगोले, राहुल चौधरी, बंटी रडके, वैभव पोतदार, चेतन देवते, प्रकाश सावरकर, बंधुत्व दुर्गा माता देवस्थानचे मनोज भोपळे, नामदेव विरखरे, गजानन शिंगरवाडे, प्रकाश सोनोने, महेश विरखरे, योगेश विरखरे, कार्तिक चौधरी, राहुल गावंडे, राजेश घोरपडे, संदीप बरथे, भूषण काळे, विकास पांडे, रूपेश पांडे उपस्थित होते.
वरूड क्षेत्रातील कोविड रुग्णांसाठी ॲम्ब्युलन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:13 IST