शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

आंबियाची गळ, संत्रा उत्पादकांसमोर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 05:01 IST

आंबिया बहराची ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या फळगळतीला तिसºया अवस्थेतील फळगळ, असे संत्रा उत्पादक संबोधतात. संत्रा झाडावर नैसर्गिकपणे आवश्यकतेपेक्षा अधिक फुले येत असल्यामुळे, जेवढ्या फळांना झाडांवर पोसण्याची क्षमता असते तेवढीच फळे झाडावर टिकून राहतात व उर्वरित फळांची गळती होते. फळांच्या योग्य वाढीसाठी झाडावर पुरेशी पालवी असणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देबिकट स्थिती : चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात अधिक गळती, फळवाढीकरिता किमान ४० पानांची आवश्यकता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात ८ ते १० दिवसांपासून ढगाळ वातावरण, पाऊस, सूर्यप्रकाशाचा अभाव यासह बुरशीच्या अटॅकमुळे झालेली कॉम्प्लेक्स स्थिती संत्र्याच्या आंबिया बहराला घातक ठरत आहे. सध्या तिसऱ्या स्टेजमधील अपरिपक्वफळांची गळती होत आहे. या तोडणीपूर्व फळगळतीमुळे संत्रा उत्पादकांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. जिल्ह्यात सर्वत्रच अशी स्थिती असली तरी चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, अचलपूर तालुक्यात सर्वाधिक तक्रारी आहेत.आंबिया बहराची ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या फळगळतीला तिसºया अवस्थेतील फळगळ, असे संत्रा उत्पादक संबोधतात. संत्रा झाडावर नैसर्गिकपणे आवश्यकतेपेक्षा अधिक फुले येत असल्यामुळे, जेवढ्या फळांना झाडांवर पोसण्याची क्षमता असते तेवढीच फळे झाडावर टिकून राहतात व उर्वरित फळांची गळती होते. फळांच्या योग्य वाढीसाठी झाडावर पुरेशी पालवी असणे आवश्यक आहे. साधारणपणे एका फळाची पूर्ण वाढ होण्यास जवळपास ४० पाने असावी लागतात.संजीवकाचा अभाव हवामानातील बदलामुळे होतो.संत्राफळांच्या वाढीसाठी नत्र महत्त्वाचे आहे. नत्रामुळे पेशीक्षयाची क्रिया मंदावते तसेच ऑक्झिन या संजीवकाच्या वाढीसाठी नत्राची आवश्यकता असते. पानातील एकूण नत्रापैकी अमोनिया-अमोनियम या संयुगाची मात्रा फळांच्या सशक्त वाढीसाठी आवश्यक आहे. या संयुगाची मात्रा कृत्रिमरीत्या यूरियाची फवारणी केल्याने वाढविता येते. फळांची योग्य वाढ होण्यासाठी अन्नद्रव्याचा नियमित पुरवठा होणे आवश्यक आहे. शिफारसीनुसार सेंद्रिय, रासायनिक तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये झाडांना देण्यात येत नाहीत. त्यामुळे फळांची वाढ होत नाही व लहान फळे गळून पडतात.जमिनीत पाणी साचल्यामुळे जमिनीतील हवा व पाण्याचे संतुलन बिघडते. यामुळे मुळांची श्वसनक्रिया तसेच अन्नद्रव्य तयार करण्याची क्रिया थांबते. त्यामुळे मुळे कुजतात व सडतात. पाने व फळे पिवळी पडून गळतात. झाडांची अन्नद्रव्य घेण्याची क्रिया मंदावते. या कारणामुळे मोठ्या प्रमाणात गळ होत असल्याचे कृषी संशोधन केंद्र अचलपूरचे उद्यानविद्या विशेषज्ज्ञ राजेंद्र वानखडे यांनी सांगितले.बुरशीमुळे संत्र्याची फळगळबोट्रिओडिप्लोडिआ, कोलीटोट्रिकम व काही अंशी ऑलटरनेरिया या बुरशीमुळे संत्रामध्ये फळगळ होते. काळी माशी, मावा-तुडतुडे यांच्या शरीरातील निघालेल्या पाकेसारख्या पदार्थावर बुरशी वाढून पेशीक्षय होऊन फळगळ होते. यात शेंडेमर रोगाला कारणीभूत असलेल्या बुरशी देठ व सालीच्या जोडावर वाढल्याने तेथे काळपट तपकिरी रंगाचे डाग पडतात व तो भाग कुजून फळांची गळती होते.फायटोफ्थोरा या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे संत्रा फळावर फळकुज्व्या हा रोग येतो. जुलै-ऑगस्टमध्ये सतत पाऊस व ढगाळ वातावरण असल्यास हा रोग मोठ्या प्रमाणावर येतो. हा रोग लहान फळावर येऊन फळांवर कुजल्यासारखे डाग/चट्टे पडतात. नंतर फळे गळून पडतात.ही उपाययोजना महत्त्वाचीकृत्रिम जैवसंजीवक नॅफथॅलीन अ‍ॅसेटिक अ‍ॅसिड (एन.ए.ए.) किंवा २,४-डी किंवा जिब्रलिक अ‍ॅसिड वनस्पतीतील अंतर्गत आॅक्झिन वाढवून पेशीक्षय मंद करण्याचे कार्य करतात. बुरशीजन्य रोगांमुळे होणारी फळगळ कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाच्या फवारण्यांमुळे रोखू शकतो. झाडावर भरपूर पालवी राहावी म्हणून अन्नदव्यांचा शिफारसीनुसार वापर करावा (५० किलो शेणखत अधिक ७.५ किलो निंबोळी ढेप, ८०० ग्रॅम नत्र (१७५० ग्रॅम युरिया), ३०० ग्रॅम स्फूरद (१८७५ ग्रॅम सिंगल सुपर स्फॉस्फेट), ६०० गॅ्रम पालाश (१००० ग्रॅम अ‍ॅझोस्पीरीलम, १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रतिझाड) सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास पुरवठा करावा, असे राजेंद्र वानखडे यांनी सांगितले.एक महिन्याच्या अंतरात तीन फवारणीजुलै महिन्यात खताची मात्रा दिली नसल्यास २६० ग्रॅम युरिया अधिक १७० ग्रॅम म्यूरेट ऑफ पोटॅश प्रति झाड देण्यात यावे. गळ कमी करण्यासाठी एन.ए.ए. १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) किंवा २,४-डी १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) किंवा जिब्रलिक अ‍ॅसिड १.५ ग्रॅम (१५ पीपीएम)ब अधिक युरिया १ किलो (१ टक्का) अधिक १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फळगळ नियंत्रणासाठी झाडावर कॉपर ऑक्सिक्लोराईड ०.३ टक्के (३० गॅ्रम १० लिटर पाणी) किंवा कार्बेन्डाझिम ०.१ टक्के (१० ग्रॅम १० लिटर पाणी) या बुरशीनाशकाची एक महिन्याच्या अंतराने जुलैपासून तीनन फवारण्या कराव्यात.