शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

अंबा एक्स्प्रेसला देशभरातील ६०० गाड्यांत स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 11:15 IST

मुंबई मार्गावरील प्रवाशांच्या पसंतीस अव्वल ठरलेली अमरावती-मुंबई अंबा एक्स्प्रेस रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या देशभरातील ६०० उत्कृष्ट गाड्यांच्या यादीत आहे.

ठळक मुद्देठरली उत्कृष्ट, लूक बदललामध्य रेल्वे भुसावळ विभागातून एकमेव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुंबई मार्गावरील प्रवाशांच्या पसंतीस अव्वल ठरलेली अमरावती-मुंबई अंबा एक्स्प्रेस रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या देशभरातील ६०० उत्कृष्ट गाड्यांच्या यादीत आहे. मध्य रेल्वे भुसावळ विभागातून यादीत स्थान मिळविणारी ही एकमेव रेल्वे गाडी आहे.अंबा एक्स्प्रेस ७ सप्टेंबर २००७ रोजी सुरू झाली. आजतागायत ही गाडी हाऊसफुल धावत आहे. भुसावळ मध्य रेल्वे विभागात सर्वाधिक उत्पन्न देत असल्याची नोंद रेल्वे विभागाने घेतली आहे. मात्र, गाडीचा लूक आणि सुविधा उच्चस्तरीय नव्हत्या. मध्यंतरी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी देशात ६०० ट्रेन उत्कृष्ट बनविण्याची घोषणा केली आणि अंबा एक्स्प्रेसचे भाग्य उजाळले. आता अंबा एक्स्प्रेसला पिवळा-लाल अशा दुहेरी रंगाने सजविण्यात आले आहे. या गाडीची अंतर्बाह्य स्वच्छता राखली जात आहे. रेल्वे विभागाने अंबा एक्स्प्रेसला प्रेस्टीजियस ट्रेन म्हणून गौरविले आहे.रंगसंगतीसह एलबीएच कोच लागलेअंबा एक्स्प्रेसच्या जुन्या डब्यांची आसन क्षमता ७२ होती. आता पिवळ्या-लाल रंगाच्या डब्यात ८२ आसन क्षमता आहे. एलईडी दिवे, सुसज्ज वातानुकूलन व्यवस्था, प्रशस्त सीट, नव्या आकाराचे शौचालय, आसनानजीक मोबाइल चार्जर आदी अद्ययावत सुविधा या डब्यांमध्ये उपलब्ध आहेत.अंबा एक्स्प्रेसची भुसावळ येथे रंगरंगोटी करण्यात आली. ही २२ डब्यांची रॅक नटली आहे. देशातील ६०० गाड्यांमध्ये तिला स्थान मिळाले आहे.- एन. एम. टेंभुर्णे, प्रमुख, कॅरेज अ‍ॅन्ड वॅगेन, अमरावती रेल्वे स्थानक

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे