शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

घरात आई, काकाचा मृतदेह असतानाही तिने दिला पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 03:47 IST

घरात आई आणि काकाचा मृतदेह अन् संपूर्ण गाव शोकमग्न झाले असतानाही दहावीेचा पेपर सोडविण्याचा कठीण प्रसंग एका विद्यार्थिनीवर आला.

नरेंद्र जावरे परतवाडा (अमरावती) : घरात आई आणि काकाचा मृतदेह अन् संपूर्ण गाव शोकमग्न झाले असतानाही दहावीेचा पेपर सोडविण्याचा कठीण प्रसंग एका विद्यार्थिनीवर आला. तिला ही बातमी पेपर झाल्यानंतर सांगण्यात आली. एकाचवेळी घरातील दोन जणांच्या मृत्यूमुळे चिखलदरा तालुक्याच्या डोमा येथे होळीला गावात चुली पेटल्या नाही. ललिता संजू बछले (३५) असे आईचे, तर विनोद नेहरू बछले (३४, रा. डोमा. ता. चिखलदरा) असे काकाचे नाव आहे.गंभीर आजारी झालेल्या ललिता बछले यांना मंगळवारी रात्री नागपूर येथे उपचारार्थ हलविण्यात आले होते. त्यांचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. विनोद बछले यांना उपचारासाठी यवतमाळला नेताना बुधवारी सायंकाळी वाटेतच परतवाड्यानजीक त्यांचा मृत्यू झाला. संजू बछले यांची मुलगी नेहाची गुरुवारपासून दहावीची परीक्षा सुरु झाली. तिचे परीक्षा केंद्र म्हसोना आदिवासी आश्रमशाळा होती. गुरुवारी मराठीचा पहिला पेपर होता. नेहाला आई आणि काकाच्या निधनाबाबत कुटुंबीयांनी सांगितले नाही. पेपर सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत असल्याने पेपर सोडवून झाल्यावर तिला ही दु:खद बातमी सांगण्यात आली.दोघांचे आॅपरेशन अन् मृत्यू थोड्या फरकानेललिता बछले आणि विनोद बछले या दीर-भावजयीला सात वर्षापूर्वी हृदयाच्या व्हॉव्ल्हच्या आजाराचे निदान झाले. दोघांचे मुंबई येथे दोन तासांच्या अंतराने आॅपरेशन करण्यात आले होते.बुधवारी दोघांचा मृत्यूसुद्धा एवढ्याच तासांच्या फरकाने झाला. दीर-भावजयीचा मृत्यू झाल्याची माहिती पंचक्रोशीत पसरताच शोककळा पसरली.>दोघांचे आॅपरेशन अन् मृत्यू थोड्या फरकानेललिता बछले आणि विनोद बछले या दीर-भावजयीला सात वर्षापूर्वी हृदयाच्या व्हॉव्ल्हच्या आजाराचे निदान झाले. दोघांचे मुंबई येथे दोन तासांच्या अंतराने आॅपरेशन करण्यात आले होते. बुधवारी दोघांचा मृत्यूसुद्धा एवढ्याच तासांच्या फरकाने झाला. दीर-भावजयीचा मृत्यू झाल्याची माहिती पंचक्रोशीत पसरताच शोककळा पसरली.

टॅग्स :examपरीक्षा