शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

एक महिन्याची परवानगी द्या आम्ही रेल्वे चालवून दाखवतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 05:00 IST

शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहाच्यावतीने ही रेल्वेगाडी आहे त्या स्थितीत सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी २ ऑक्टोबरपासून अचलपूर ते यवतमाळ  रेल्वे मार्गावरील गावांमध्ये जनजागरण, पदयात्रा व रेल्वे स्थानक स्वच्छता करण्याचा अभिनव उपक्रम दर्यापूर, मूर्तिजापूर, लाखपुरी, कापूसतळणी, अचलपूर, पथ्रोट, शिंदी बु. येथे विजय विल्हेकर यांच्या पुढाकारात आंदोलन करण्यात आले. कोकर्डा येथे शनिवारी शकुंतला नॅरोगेजची  तांत्रिक बाजू समजून घेण्याच्या उद्देशाने या विषयातील तज्ज्ञ ज्ञानेश  मदन माहुले  यांना निमंत्रित केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवनोजा बाग : विदेशी क्लिक्सन कंपनीला १०४ वर्षे शकुंतला रेल्वेचा मालकी हक्क दिला. आता ती मुदत संपली असताना हा रेल्वेमार्ग बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी रेल्वे या विषयातील पारंगत तथा तज्ज्ञ ग्यानेश मदन माहुलेंना संधी द्या, एक महिन्याची परवानगी द्या, आम्ही रेल्वे चालवून दाखवतो, असा निर्धार विजय विल्हेकर यांनी व्यक्त केला. शकुंतला एक्स्प्रेस बचाव सत्याग्रहच्यावतीने अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कोकर्डा येथे २३ ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्यात आले. शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहाच्यावतीने ही रेल्वेगाडी आहे त्या स्थितीत सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी २ ऑक्टोबरपासून अचलपूर ते यवतमाळ  रेल्वे मार्गावरील गावांमध्ये जनजागरण, पदयात्रा व रेल्वे स्थानक स्वच्छता करण्याचा अभिनव उपक्रम दर्यापूर, मूर्तिजापूर, लाखपुरी, कापूसतळणी, अचलपूर, पथ्रोट, शिंदी बु. येथे विजय विल्हेकर यांच्या पुढाकारात आंदोलन करण्यात आले. कोकर्डा येथे शनिवारी शकुंतला नॅरोगेजची  तांत्रिक बाजू समजून घेण्याच्या उद्देशाने या विषयातील तज्ज्ञ ज्ञानेश  मदन माहुले  यांना निमंत्रित केले होते. ज्येष्ठ सत्याग्रही गजानन देवके यांनी त्यांचा परिचय दिला. यावेळी ग्यानेश यांना ‘लोहशिल्पकार’ हा किताब बहाल करण्यात आला.ग्यानेश माहुले हे मदन इंजिनिअरिंग वर्क्सचे मुख्य संचालक मालक आहेत. त्यांच्या निर्माण केलेल्या रेल्वे इंजिनना देशविदेशात प्रचंड मागणी आहे. त्यांना हेरिटेज अभियांत्रिकीमध्ये रस आहे. त्यांच्याकडे नॅरोगेजचे स्टीम इंजिनसह अनेक पुरातन वस्तू संग्रही आहेत. शेगावच्या आनंद सागरमधील वैभवी रेल्वे ही त्यांचीच निर्मिती आहे. मलेशिया, सौदी अरेबियातदेखील त्यांचे इंजिन धावत आहेत. यावेळी सत्याग्रही म्हणून लक्ष्मण कुले, लाखनवाडी येथील सरपंच विवेक देशमुख, अनंत पानझाडे, नीलेश जामोदकर, सौरभ माहुरे, वैभव काकड, शुभम घाटे, निखिल  आसोलकर, पवन काठोळे, हृषीकेश साबळे, पुरुषोत्तम बुरघाटे, बंटी काकड, स्वराज माहुरे, किरण साबळे, चेतन इसळ, बाबाराव खंडारे, संतोष वर्धे, वंदना खंडारे, ज्योती वर्धे, विशाखा खंडारे, सीमा खंडारे, रूपाली खंडारे आदी उपस्थित होते.  यावेळी गावातून  फेरी काढून प्रतीकात्मक शकुंतला एक्स्प्रेस रेल्वे इंजिन फिरवण्यात आले.

 

टॅग्स :Shakuntala Trainशकुंतला रेल्वे