शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात 30 हजार शाळांना एक लाख फुटबॉलचे होणार वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 17:06 IST

‘फिफा’ फुटबॉल वर्ल्ड कप जनजागृती : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचा पुढाकार

गणेश वासनिक/अमरावती, दि. 30 - देशात पहिल्यांदाच १७ वर्षे वयोगटातील फिफा फुटबॉल वर्ल्ड कप सामन्याचे आयोजन ६ ते ३० ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने राज्याचा क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने फुटबॉल खेळाचे वातावरण आणि आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी राज्यात ३० हजार शाळांमध्ये एक लाख फुटबॉल वाटप केले जाणार आहे. त्याकरिता शाळांना १० सप्टेंबर २०१७ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावयाची असून प्रत्येक शाळेला तीन फुटबॉल मिळणार आहे.

‘फिफा’ फुटबॉल वर्ल्ड कपचे सामने गुवाहाटी, कोलकाता, दिल्ली व मुंबई येथे होणार आहेत. आतापर्यंत ‘फिफा’ फुटबॉल स्पर्धेकरिता २४ देशांच्या चमूंनी नोंदणी केली असून ते सहभागी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. केंद्र सरकारने ‘फिफा’ वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कुठल्याही उणिवा राहू नये, यासाठी युद्धस्तरावर बैठकांचे सत्र चालविले आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्यावतीने फुटबॉल खेळाचे महत्त्व, आवड आणि वातावरण निर्मिती व्हावी, यासाठी गाव, खेड्यांत प्रचार व प्रसार होण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. 

पहिल्या टप्प्यात ३० हजार शाळांना फुटबॉल वाटप करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यानंतर विधानसभा मतदार संघनिहाय तालुकास्तरावर आमदार फुटबॉल चषक सामन्यांचे आयोजनदेखील करण्यात येईल. या स्पर्धा आयोजनासाठी पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे निधी वितरित केले जाणार आहे. राज्यातील प्रत्येक शहर, गाव, खेड्यात सप्टेंबर महिन्यात फुटबॉलमय वातावरण निर्माण व्हावे, यासाठी एक मिलियन फुटबॉल उत्सव हा उपक्रम राबविला जाणार आहे.        देशभरात १५ सप्टेंबर रोजी फुटबॉल खेळल्या जाणार‘फिफा’ फुटबॉल वर्ल्ड कप जनजागृतीसाठी देशभरात १५ सप्टेंबरला एकाच दिवशी ठिकठिकाणी फुटबॉल खेळाचे आयोजन केले जाणार आहे. फुटबॉल खेळाची आवड असलेल्या प्रत्येकांना यात सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यानुसार केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने तयारी चालविली आहे.‘फिफा’ फुटबॉल वर्ल्ड कप आयोजनाच्या पार्श्वभूमिवर फुटबॉल खेळाचे जनजागृतीसाठी विविध क्रीडा उपक्रम राबविले जात आहे. प्रत्येक शाळेला तीन फुटबॉल वाटपानुसार जिल्ह्यात ६५० शाळांना सुमारे २० हजार फुटबॉल वाटपाचे नियोजन आहे.- गणेश जाधव,जिल्हा क्रीडा अधिकारी, अमरावती