शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
2
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
3
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
4
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
5
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
6
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
7
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
8
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
9
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
10
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
11
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
12
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
13
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
15
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
16
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
17
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
18
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
19
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
20
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?

निधी वाटपावरून गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:01 IST

महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, सभागृहनेता, विरोधी पक्षनेता यांना प्रत्येकी २० लाख, शिवसेना व बसपाचे गटनेता यांना प्रत्येकी १५ लाख, अपक्ष गटनेता यांना १० लाखांचा निधी देण्यात आला. तर फक्त एमआयएमलाच डावलण्यात आल्याचे सांगत, ‘आपला माणूस, आपला महापौर कुठे?’ असा सवाल अब्दुल नाझीम यांनी केला.

ठळक मुद्देमहापालिका आमसभा : सभागृहात एमआयएम आक्रमक, काँग्रेसची साथ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेत महापालिकेला प्राप्त निधीतून फक्त एमआयएमलाच डावलल्याचा आरोप गटनेता अब्दुल नाझीम यांनी महापालिका सभागृहात केल्याने सत्तापक्ष व विरोधी सदस्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. गुरुवारच्या महासभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर नाझीम यांनी सभापतींना याविषयी विचारणा केल्यानंतर हा प्रकार घडला.महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, सभागृहनेता, विरोधी पक्षनेता यांना प्रत्येकी २० लाख, शिवसेना व बसपाचे गटनेता यांना प्रत्येकी १५ लाख, अपक्ष गटनेता यांना १० लाखांचा निधी देण्यात आला. तर फक्त एमआयएमलाच डावलण्यात आल्याचे सांगत, ‘आपला माणूस, आपला महापौर कुठे?’ असा सवाल अब्दुल नाझीम यांनी केला. सभागृहात १० सदस्य असणारा एमआयएम हा तिसऱ्या क्रमाकांचा पक्ष असताना सभापतींना एवढा तिटकारा का, अशी त्यांनी विचारणा केली. शहरात अन्य प्रभागांत ‘वॉक अँड टॉक वुईथ मेयर’ हा चांगला उपक्रम राबविणाºया महापौरांना आमचा प्रभाग दिसत नाही काय? शहरातल्या सर्व स्मशानभूमींची पाहणी करून कामे सुचविणाºया महापौरांना कब्रस्तान दिसले नाही, असा आरोप केल्यानंतर सत्तापक्षातील बाळासाहेब भुयार, अजय सारसकर, सचिन रासने, तुषार भारतीय, संध्या टिकले, मिलिंद चिमोटे आदी सदस्यही आक्रमक झाले. आजच्या सभेत हा विषय नाही, सभागृह नियमाने चालावे, अशी मागणी त्यांनी सभापतींकडे रेटून धरली.सभागृहात गोंधळ सुरु झाल्याने एकमेकांनी मत मांडावे, अशी सूचना ज्येष्ठ सदस्य विलास इंगोले यांनी केली. एका गटाला एक व दुसºया गटाला दुसरा नियम का, असा सवाल करीत बसपाचे चेतन पवार एमआयएमच्या मदतीला धावले. सभापती हे एका पक्षाचे नव्हे, शहराचे आहेत. एखाद्या सदस्यावर जर अन्याय झाला असेल, तर त्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो, असे सुचवित मंजूषा जाधव यांनीही सुरात सूर मिसळला. निधीचे असमान वाटप होत असल्याने महापौर सर्वांचे की भाजपचे, असा सवाल अब्दुल नाझीम यांनी उपस्थित केला. पक्षाचा उल्लेख केल्याचा आरोप करीत सत्तापक्षाच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने सभागृहात चांगलाच गोंधळ झाला.क्रीडापटूंच्या मदतीसाठी लगेच निर्णयशहरातील खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर शहराचे नाव उंचावत असताना त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी गतवर्षी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. मात्र, एक वर्षानंतरही ही मदत मिळाली नसल्याचा मुद्दा सभापतींच्या परवानगीने तुषार भारतीय यांनी लावून धरला. तांत्रिक कारणांमुळे ही मदत मिळू शकली नसल्याचे स्पष्ट करीत, येत्या चार दिवसात खेळाडूंना ही मदत देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त संजय निपाणे यांनी सभागृहाला दिली.