शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अप्पर वर्धाची सर्व दारे पुन्हा उघडली, धरण ९९.६४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 05:00 IST

मोर्शीजवळ असलेल्या अप्पर वर्धा धरण क्षेत्रामध्ये कमी पाऊस पडल्याने भर पावसाळ्यात या धरणात केवळ ७८ टक्के पाण्याचा साठा झाला होता. शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नळ-दमयंती सागर म्हणजेच अप्पर वर्धा धरणाची पाणी साठवण्याची मर्यादा ३४२.५० एवढी आहे. २३ सप्टेंबर रोजी या धरणामध्ये ३४२.४८ मीटर पाणीसाठा झाला आहे. पहिल्यांदाच ११ सप्टेंबर रोजी पाच दारे ५० सेंटिमीटरने उघडण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गणल्या जाणाऱ्या अप्पर वर्धा धरणात २३ सप्टेंबर रोजी ९९.६४ टक्के जलसाठा झाला. त्यामुळे सर्व १३ दारे ५० सेंटिमीटरने उघडण्यात आली आहेत. त्यामधून १०५३ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग वर्धा नदीपात्रात होत आहे. या तेराही दरवाजातून वाहणाऱ्या पाण्याचे विहंगम दृश्य बघण्यासाठी पर्यटकांनी पुन्हा मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मोर्शीजवळ असलेल्या अप्पर वर्धा धरण क्षेत्रामध्ये कमी पाऊस पडल्याने भर पावसाळ्यात या धरणात केवळ ७८ टक्के पाण्याचा साठा झाला होता. शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नळ-दमयंती सागर म्हणजेच अप्पर वर्धा धरणाची पाणी साठवण्याची मर्यादा ३४२.५० एवढी आहे. २३ सप्टेंबर रोजी या धरणामध्ये ३४२.४८ मीटर पाणीसाठा झाला आहे. पहिल्यांदाच ११ सप्टेंबर रोजी पाच दारे ५० सेंटिमीटरने उघडण्यात आली होती. परंतु, धरणात पाण्याचा येवा वाढत असल्याचे पाहून त्याच दिवशी रात्री ११ वाजता धरणाची १३ दरवाजे उघडण्यात आली होती. गुरुवारी सकाळपर्यंत सहा दरवाजे उघडी ठेवण्यात आली होती. मात्र, मध्य प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने आवक वाढत गेली. सध्या अप्पर वर्धा धरणाची निर्धारित लेव्हल व धरण १०० टक्के पूर्णत्वास जात असल्याचे पाहून तेराही दारे उघडून मोठ्या प्रमाणात विसर्ग वर्धा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तेराही गेटमधून सोडण्यात येणारे पाण्याचे विहंगम दृश्य बघण्यासाठी व पाण्याचे तुषार अंगावर घेण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पर्यटक कुटुंबकबिल्यासह धरणातून उडणारे तुषार अंगावर झेलण्यासाठी येत आहेत. दरम्यान, अप्पर वर्धा धरणाच्या पुलावरून एक युवक काही दिवसांपूर्वी  नदीपात्रात वाहून गेला होता. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी अप्पर वर्धा धरण परिसरात मोर्शी पोलीस ठाण्याच्यावतीने बॅरिकेड लावण्यात आले आहेत.धरणाचे अधिकारी व बीट अंमलदार राहुल वानखडे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. 

टॅग्स :dam tourismधरण पर्यटनDamधरण