बैठक : पालकमंत्र्यांचे निर्देश अमरावती : अमरावतीच्या नांदगाव पेठ टेक्स्टाईल पार्कमधील उद्योजकांना सर्व मूलभूत सुविधा तातडीने पुरवा, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी दिले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ना.पोटे यांच्या अध्यक्षतेखाली टेक्स्टाईल पार्कबाबत आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्यासह उद्योजक सर्वश्री सियाराम सिल्क मिलचे पवन पोड्डास, पवन बोपचे, गोल्डन फायबरचे अरविंद बियाणी, मोहोड, एनटीसीचे एस.के.शर्मा, राहुल वानखडे, व्ही.एन.पाल, रोहित बग्गा, प्रवीण ठोंबरे, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, अन्य पदाधिकारी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी एस.एस.वासनिक, महाव्यवस्थापक पुरी, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे राहुल वानखडे, कौशल्य विकासचे झडके, विद्युत विभागाचे मोहोड, दुरसंचार, एमआयडीसी आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.ना.पोटे यांनी यावेळी उपस्थित उद्योजकांच्या टेक्स्टाईल पार्कमधील अडीअडचणी समजावून घेतल्या. टेक्स्टाईल पार्कमध्ये पोलीस स्टेशनसाठी गाळा देणे आदी सुविधा पुरवाव्यात असे निर्देश ना. पोटेंनी दिले
टेक्स्टाईल पार्कमधील उद्योजकांना सर्व मूलभूत सुविधा
By admin | Updated: July 24, 2016 00:06 IST