शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात नोकर भरती करणे बंद करा, आता हे चालणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांचा गुगल, मायक्रोसॉफ्टसह अमेरिकी कंपन्यांना इशारा
2
भारत आणि इंग्लंडमध्ये मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या, या वस्तू होणार स्वस्त, पाहा यादी
3
Rishabh Pant Injury Update : पंत विकेटमागे दिसणार नाही; पण गरज पडल्यास तो बॅटिंग करेल! BCCI नं दिली माहिती
4
“निवडणूक आयोगाने केलेली मतांची चोरी पकडली, १०० टक्के पुरावे...”; राहुल गांधी पुन्हा बरसले
5
वडील मौलवी, मुलगा पुजारी; कृष्णा बनून मंदिरात पूजा करायचा कासिम, लोकांना संशय आला अन्...
6
"इजा, बिजा झाला, तिजाची वेळ आणू नका"; अजितदादांनी माणिकराव कोकाटेंना दिला होता इशारा
7
कंपनीला नुकसान, पण अध्यक्षांना 'बंपर' पगारवाढ! टाटा सन्सच्या N. चंद्रशेखरन यांचं पॅकेज पाहून डोळे विस्फारतील!
8
'कलाकेंद्रातील महिला गोळीच्या आवाजाने बेशुद्ध'; दौंड गोळीबारप्रकरणी आरोपींवर मकोका लावण्याच्या अजित पवारांच्या सूचना
9
पाकिस्तानी पासपोर्टचा नंबर शेवटून चौथ्या नंबरवर; भारतासाठी आनंदाची बातमी
10
रात्रीच्या अंधारात विवाहित प्रेयसीला भेटायला आला प्रियकर, नेहमीच्या ठिकाणी पोचला अन् पाहतो तर...
11
राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय! प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
12
IND vs ENG : पंतच्या जागी इशान किशनला मिळू शकते संधी; या कारणांमुळे तो ठरतो प्रबळ दावेदार
13
“स्वागत, अभिनंदन करतो”; मोहन भागवत-मुस्लीम धर्मगुरू बैठकीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
14
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; उच्चांकी स्तरावरुन मोठ्या प्रमाणात घसरले दर, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमत
15
धक्कादायक! पत्नीने पतीची जीभ तोडून खाल्ली; रक्तही प्यायली, ऐकून पोलिसही चक्रावले...
16
Shravan Somvar 2025: सोळा सोमवारचे व्रत कठीण पण तेवढेच फलदायी, कधी करावी सुरुवात? वाचा व्रतविधी!
17
'दिलबर जानी'चा कारनामा! १९ वर्षाचा तरुण महिला, तरुणींचे बनवायचा व्हिडीओ; 'बंगळुरू नाईट लाईफ'च्या नावाखाली...
18
IND vs ENG: दुष्काळात तेरावा महिना! दुखापतीमुळे ऋषभ पंत मालिकेतून बाहेर, ६ आठवडे विश्रांतीचा सल्ला
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांनो, Good News! ८वा वेतन आयोग कधी येणार? पगार किती वाढणार? जाणून घ्या सविस्तर!
20
Smriti Irani : फाटलेला टी-शर्ट अन् साइड रोल...; ज्योतिषाच्या 'त्या' भविष्याणीमुळे बदललं स्मृती इराणीचं आयुष्य

स्क्रब टायफस आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेला अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 19:46 IST

कोकणातील कुडाळ व सावंतवाडी येथील दोन रुग्ण स्क्रब टायफस पॉझिटिव्ह आढळल्याच्या पार्श्वभूमीवर या आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेला अलर्ट देण्यात आला आहे.

 अमरावती - कोकणातील कुडाळ व सावंतवाडी येथील दोन रुग्ण स्क्रब टायफस पॉझिटिव्ह आढळल्याच्या पार्श्वभूमीवर या आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेला अलर्ट देण्यात आला आहे. ‘रिकेटशिअल’ आजारात मोडणारा स्क्रब टायफस कीटकापासून मानवात संक्रमित होतो. महाराष्ट्रासह सात राज्यांवर या आजाराचे सावट असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

राजस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि वेल्लोरमध्ये सर्वप्रथम स्क्रब टायफसची नोंद झाली होती. सिक्कीम, हिमाचल, नागालँड आणि मणिपूरमध्ये काही रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. सन २००४ मध्ये जुलै ते आॅक्टोबर या कालावधीत हिमाचल प्रदेशात केलेल्या एका अभ्यासात रिकेटशिअल आजाराची नोंद झाली. त्यानंतर २०१७ मध्ये देशभरात विविध ठिकाणी रिकेटशिअल आजाराचे रुग्ण तुरळक स्वरूपात आढळून आलेत. यामध्ये स्क्रब टायफसचे प्रमाण अधिक असल्याचे राज्याच्या आरोग्य सेवा सहसंचालकांनी स्पष्ट केले आहे. नागपूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्क्रब टायफसचे रुग्ण आढळले. काही महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यातील सिंदेवाडी गावातही इपिडेमिक टायफस आजाराचा उदे्रक झाला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, महापालिका व जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर प्रभावी उपाययोजनांचे निर्देश देण्यात आले आहेत. या आजाराच्या उपचारासाठी डॉक्सीसायक्लिन व अझिथ्रोमायसिन यांसारखे अँटिबायोटिक उपयुक्त आहेत. तूर्तास महाराष्ट्रात स्क्रब टायफसचे सावट असले तरी घाबरून जाऊ नये, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. पाऊस पडला की, स्क्रब टायफसचे रुग्ण आढळतात. ओरिएन्शिया सुसुगामुशी नामक बॅक्टेरियामुळे होणारा हा अतिशय गंभीर आजार आहे. स्क्रब टायफसची पहिली नोंद जपानमध्ये १८९९ साली झाली. भारतात दुस-या महायुद्धाच्या वेळी आसाममध्ये या आजाराच्या रुग्णांची नोंद झाली होती.

काय आहे स्क्रब टायफस?या आजारात ज्या ठिकाणी ‘चिगर’ चावतो, तेथे भाजल्यासारखे व्रण येतात. साधारणपणे पानावर वाढणाºया कीटकांपासून स्क्रब टायफस होतो. या कीटकाने चावा घेतल्यानंतर त्याच्या सोंडेतील विषाणू रक्तामार्फत शरीरात प्रवेश करतात. अतिशय सूक्ष्म असलेला हा किडा उकिरडे, शेणखत आणि काडीकचºयावर जगतो. 

मानव हा आकस्मिक ‘होस्ट’ट्राम्बिक्यूलिड माइटचा लार्व्हा, ज्याला ‘चिगर’ म्हणतात, ते चावल्याने ओरिएन्टा सुसुगामुशी हे जंतू मानवाच्या शरीरात प्रवेश करतात. जेथे झाडेझुडुपे किंवा गवत असते, त्यावर हे चिगर असतात. गवत कापताना ते माणसाला चावतात. मानव हे त्यांच्यासाठी आकस्मिक होस्ट आहे. हे चिगर उंदरांना चावतात आणि तेथून रोग पसरतो. मोठी माइट चावत नाही आणि ती जमिनीवरच असते. चिगर लार्व्हाचा आकार सूक्ष्म असतो. त्यामुळे ते डोळ्यांनी दिसत नाहीत. ते चावल्याच्या ठिकाणी दुखतही नाही. चिगर चावल्यानंतर पाच ते वीस दिवसांनी लक्षणे दिसायला लागतात.

स्क्रब टायफसची लक्षणे ‘स्क्रब टायफस’ या आजारात झटके येणे, शरीरातील पाणी कमी होणे, ताप येणे अशी लक्षणे आढळतात. हा ताप १०४ डिग्रीपर्यंत राहतो. साधारण २४ तासांच्या आत थकवा येतो. शरीराचे अवयव, स्रायू, सांधे दुखू लागतात. या आजाराचे वेळीच निदान झाले नाही, तर शरीरात दबा धरून बसलेले हे परजिवी मेंदू, मूत्रपिंडाची क्रिया बंद पाडू शकतात. साधारणपणे ताप आणि काविळीची लक्षणे आढळून आल्यानंतरही हा आजार अनेकदा डोके वर काढतो. 

सिंधुदुर्गमध्ये दोन रुग्ण स्क्रब टायफस पॉझिटिव्ह आढळल्याच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क आहे. विभागात अद्याप या आजाराची लागण नाही. वेल फिलिक्स ही चाचणी निदानासाठी उपयुक्त आहे. - नितीन अंबाडेकर, उपसंचालक, आरोग्य सेवा, आरोग्य मंडळ अकोला

टॅग्स :Healthआरोग्य