शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

५६१ एसटी चालकांची अल्कोहोल चाचणी; वाढत्या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी महामंडळाचा पुढाकार 

By जितेंद्र दखने | Updated: September 1, 2023 18:15 IST

चालक मद्यपान करून कर्तव्य बजावत असल्याची प्रकरणे आढळल्याने एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी नाराजी व्यक्त केली होती.

अमरावती : 'सुरक्षित प्रवास' हे ब्रीद वाक्य असलेल्या एसटी महामंडळातील काही चालक-वाहक मद्यप्राशन करून काम करत असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने वाहतूक खाते, सुरक्षा आणि दक्षता खाते संयुक्तपणे दोन दिवस मद्यपान तपासणी मोहीम राबविणार आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला ही मोहीम राबविण्यात आली आहे.यामध्ये गुरूवारी विभागातील ५६१ एसटी चालकांची अल्कोहोल टेस्ट करण्यात आली. अचानक तपासणी न करता या मोहिमेची घोषणा करण्यात आल्याने ही मोहीम पारदर्शकपणे कशी राबवली जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

चालक मद्यपान करून कर्तव्य बजावत असल्याची प्रकरणे आढळल्याने एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी नाराजी व्यक्त केली होती. महामंडळात बहुतांशी आगारात अल्कोटेस्ट मशीन दिल्या असतांना स्थानकावर तसेच मार्गतपासणी दरम्यान मद्यपान करणाऱ्या चालकांची तपासणी करण्याबाबत सूचना देखील आहेत. परंतु तरीही कामगिरीवरील चालकांनी मद्यपान केल्याचे अनेकदा आढळून येत आहे. त्यामुळेच ही मद्यपान तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश त्यांनी विभाग नियंत्रकांना दिले होते. यात १०० टक्के मद्यपान तपासणी करण्यासाठी २ दिवसांची मोहिम राबवावी अशा सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सुरक्षा व दक्षता शाखा व वाहतूक शाखा यांच्यासह संयुक्त तपासणी मोहीम एसटीच्या अमरावती विभागात गुरुवारी पहाटे ५.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत, ५६१ चालकांची अल्कोहोल चाचणी करण्यात आली. अपघातांवर नियंत्रणासाठी महामंडळाचा पुढाकारएसटीच्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही चाचणी एसटी महामंडळाद्वारे अमरावती विभागातही चाचणी करण्यात आली.यानुसार अमरावती मध्यवर्ती बसस्थानकांवर १२३, राजापेठ बसस्थानकांवर ४०, परतवाडा ७०, वरुड ६३, मोर्शी ९८, चांदूर बाजार ५७ ,चांदूर रेल्वे ४५, दर्यापूर ६५ अशा एकूण ५६१ बस चालकांच्या चाचण्या करण्यात आल्या.अमरावती विभागासह अन्य कुठल्याही विभागातील बस स्थानकावरून ज्यो बसेस जातील त्यांच्या प्रत्येक चालकांची अल्कोहोल चाचणी घेण्यात आली.ही मोहीम यापुढेही सुरू ठेवली जाईल.निलेश बेलसरे,विभाग नियंत्रक अमरावती

टॅग्स :Bus DriverबसचालकAmravatiअमरावती