लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मद्यधुंद चालकाचा भरधाव आॅटो दसरा मैदानासमोरील एका व्यापारी प्रतिष्ठानावर धडकल्याने शनिवारी दुपारी प्रचंड खळबळ उडाली. या अपघातात एका नामांकित कंपनीच्या रेडीमेड कापड शोरूमचे शेटर वाकून काचा फुटल्या. सुदैवाने दोघे बचावले. या घटनेची तक्रार देण्यासाठी शोरूमचे मॅनेजर गजानन वसंतराव धानोरकर (३५,रा.साईनगर) राजापेठ ठाण्यात गेले होते. शनिवारी दुपारी बडनेरा मार्गावरील वर्दळीच्या वाहतुकीमुळे अचानक आॅटो क्रमांक एमएच २७ बीडब्ल्यू १६९१ अनियंत्रित होऊन एका बंद व्यापारी प्रतिष्ठानावर जाऊन धडकला. तत्पूर्वी पार्कींगमधील दुचाकी क्रमांक एमएच २७ एडब्ल्यू ६२८८ ला आॅटोने धडक दिली. व्यापारी प्रतिष्ठानाच्या शेटरचे नादुरुस्ती असल्याने सैय्यद जुबेर हुसैन व इरशाद शाह हे दोघे कामगार शिडी लावून कामच करीत होते. अचानक आॅटो अंगावर येत असल्याचे पाहून ते प्रसंगावधान राखून बाजूला सरकल्याने बचावले. या अपघातात कापड शोरूमचे शेटर वाकून आतील महागड्या कांचा फुटल्या. घटनेनंतर नागरिकांनी आॅटोला घेराव घातला. पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहे.
बंद व्यापारी प्रतिष्ठानाच्या शटरवर मद्यपीचा अनियंत्रित आॅटो धडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 23:02 IST
मद्यधुंद चालकाचा भरधाव आॅटो दसरा मैदानासमोरील एका व्यापारी प्रतिष्ठानावर धडकल्याने शनिवारी दुपारी प्रचंड खळबळ उडाली. या अपघातात एका नामांकित कंपनीच्या रेडीमेड कापड शोरूमचे शेटर वाकून काचा फुटल्या.
बंद व्यापारी प्रतिष्ठानाच्या शटरवर मद्यपीचा अनियंत्रित आॅटो धडकला
ठळक मुद्देदसरा मैदानासमोरील घटना : राजापेठ पोलिसात तक्रार, सुदैवाने दोघे बचावले