अक्षय शरद भुयार (३१, रा. उज्ज्वल कॉलनी, अमरावती) असे या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याला बडनेरा पोलिसांनी २६ रोजी अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. २३ जून २०२१ रोजी कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ रामेश्वर अमृतराव धापके यांनी घडलेल्या संपूर्ण घटनाक्रमाची फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी प्रणव विकास बुरंगे (रा. गाडगेनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याची अटकदेखील झाली होती. पुढे तपासादरम्यान या प्रकरणात नवीन एका आरोपीची भर पडली आहे. कागदपत्रांमध्ये खोडतोड करून संस्थेचा विश्वासघात व फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीमध्ये नमूद होता. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत डगवाल हे अधिक तपास करीत आहेत.
केव्हीकेमधील अफरातफरीत अक्षय भुयार अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:14 IST