शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

सुनेला जाळणा-या सासूला आजन्म कारावास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 20:02 IST

अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल 

अमरावती : सुनेला रॉकेल ओतून जिवंत जाळणाºया सासूला अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खेडपिंप्री येथे २०१३ मध्ये ही घटना घडली होती.      विधी सूत्रानुसार, सोनू संदीप लसन्ते (२०) असे मृताचे नाव आहे. घटनेच्या  दीड वर्षांपूर्वी सोनूचे संदीपसोबत लग्न झाले होते. प्रारंभी दोन खोल्यांच्या छोटेखानी घरात नवरा संदीप, सासरा हरिभाऊ व सासू कमलाबाई यांच्यासोबत राहत होती. मात्र, सासूसोबत होणाºया कुरबुरींमुळे सोनूने पतीसोबत त्याच घरात वेगळा संसार थाटला होता. ती माहेरी गेल्यानंतर केवळ सासूचाच त्रास असल्याचे सांगायची. २४ एप्रिल २०१३ रोजी सकाळी ८ वाजता ती चुलीवर स्वयंपाक करीत असताना सासू कमलाबाईने मागून येऊन तिच्या अंगावर रॉकेल ओतले आणि आगपेटी लावली. सोनूने अंगणातील टाक्यात स्वत: झोकून देऊन आग विझविली. मात्र, त्यापूर्वी ती पूर्णपणे भाजली होती.  सोनूला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. कार्यकारी दंडाधिकारी रवि महल्ले यांनी डॉ. अभिषेक नायडू यांच्या उपस्थितीत तिचे मृत्युपूर्व बयाण नोंदविले. रात्री ११.४५ वाजता तिचा मृत्यू झाला. मृत्युपूर्व बयाणावरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी कलमाबाई हरिभाऊ लसन्ते (६०) हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग तायडे यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल पानसरे यांच्या न्यायासनापुढे चाललेल्या खटल्यात सरकारी अभियोक्ता दीपक आंबलकर यांनी सहा साक्षीदार तपासले.  त्यापैकी सुदाम डुकरे हा फितुर झाला. तथापि, मृत सोनूची आई अंतकला आनंदा राऊत, डॉ. अभिषेक नायडू व कार्यकारी दंडाधिकारी महाले यांच्या साक्षी निर्णायक ठरल्या. न्यायालयाने या प्रकरणी आरोपी कमलाबाईला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.