शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कृषी उत्पन्न बाजार समिती रामभरोसे

By admin | Updated: January 23, 2016 00:35 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध धान्याची आवक वाढली आहे. परंतु ढगाळी वातावरणात शेतकऱ्यांचे धान्य उघड्यावर ठेवण्यात आले आहे.

कोट्यवधींचे धान्य उघड्यावर : शेडमध्ये व्यापाऱ्यांचा माल, अशुद्ध पाणीपुरवठा मनीष कहाते अमरावतीयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध धान्याची आवक वाढली आहे. परंतु ढगाळी वातावरणात शेतकऱ्यांचे धान्य उघड्यावर ठेवण्यात आले आहे. मात्र व्यापाऱ्यांनी शेडमध्ये धान्य ठेवल्याने शेतकऱ्यांच्या धान्याचे पावसामुळे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.विलासनगर स्थित कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल साठवणूक आणि हर्रास करण्याकरिता ७० हजार स्के. फुटाचे दोन शेड आहे. एक ५००० स्के. फुटांचा अशा तीन शेड शेतकऱ्यांच्या मालाऐवजी व्यापाऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणात पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा तूर, सोयाबीन, उडीद, ज्वारी, हरभरा इत्यादी धान्य उघड्यावर पडून आहे. अवकाळी पाऊस आल्यास संपूर्ण धान्य ओले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र बाजार समितीत आहे. दररोज चार कोटी रुपयांची उलाढाल होत असलेल्या बाजार समितीत ४०० दलालसह १५० व्यापारी आहेत. वर्षाला बाजार समितीला कोट्यवधींचा नफा शेतकऱ्यांच्या माध्यमातून अप्र्रत्यक्षपणे बाजार समितीला होता. परंतु त्याप्रमाणात बाजार समितीने शेतकऱ्यांना कोणत्याही सुविधा निर्माण करण्यात आल्या नाहीत. टीएमसी शेडजवळ शेतकऱ्यांसाठी पाणी पिण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे शेतकरी जवळच्या हॉटेलमध्ये पाणी पिण्यासाठी जातात. शिदोरीही तिथेच खातात. बाजार समितीचा २२ एकरांचा परिसर आहे. जिकडे- तिडके घाणच घाण आहे. परिसरात तीन धान्य साठवणुकीचे शेड, दलालांचे शेकडो दुकाने आहेत. प्रत्येक दलाल आपआपल्या दुकानांसमोर शेतकऱ्यांचा माल हर्रास करतात. मात्र शेडमध्ये व्यापाऱ्यांचे धान्याचे सुमारे ६० हजार पोते पडून आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रोज ४० हजार विविध धान्याचे पोत्याचे आवक सुरू आहे. परंतु ढगाळी वातावरण असतानाही माल उघडण्यावर आहे.