शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

भाऊसाहेबांच्या जन्मगावी लवकरच कृषी महाविद्यालय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 05:00 IST

राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले, मी महाविद्यालयात असताना कृषी आणि शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेबांनी केलेले कार्य ऐकले होते. आज श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात आल्यानंतर  अनुभवले. पंतप्रधान नेहरूंच्या काळात देश प्रगतीकडे वाटचाल करीत होता. देशात नव्या उद्योगक्रांतीचे धोरण आखले जात होते, त्यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी कृषिमंत्री म्हणून कृषिक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविला आणि शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तनासाठी पुरेपूर प्रयत्न केले. भाऊसाहेब हे शिक्षण व कृषिमहर्षी आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथे लवकरच कृषी महाविद्यालय स्थापन होणार असल्याचे संकेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी येथे दिले. श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारे संचलित श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी राज्यपाल बोलत होते. समारंभाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख होते. विशेष अतिथी म्हणून महापौर चेतन गावंडे, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके यांच्यासह संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, सचिव शेषराव खाडे, प्राचार्य नंदकिशोर चिखले आदी उपस्थित होते. राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले, मी महाविद्यालयात असताना कृषी आणि शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेबांनी केलेले कार्य ऐकले होते. आज श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात आल्यानंतर  अनुभवले. पंतप्रधान नेहरूंच्या काळात देश प्रगतीकडे वाटचाल करीत होता. देशात नव्या उद्योगक्रांतीचे धोरण आखले जात होते, त्यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी कृषिमंत्री म्हणून कृषिक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविला आणि शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तनासाठी पुरेपूर प्रयत्न केले. भाऊसाहेब हे शिक्षण व कृषिमहर्षी आहेत. त्यामुळे त्यांच्या जन्मगावी पापळ येथे कृषी महाविद्यालयाची निर्मिती व्हावी, असा प्रस्ताव श्री शिवाजी शिक्षण संस्थेने देताच त्या अनुषंगाने कृषिमंत्री दादाजी भुसे, कृषी विभागाचे सचिव, कृषी आयुक्त, आदींची यासंदर्भात बैठक घेतली. आतापर्यंत राज्यात स्थापन झालेल्या कृषी महाविद्यालयांची संख्या, माहिती जाणून घेतली. भाऊसाहेबांच्या जन्मगावी कृषी महाविद्यालय स्थापन व्हावे, यासाठी स्वत: पुढाकार घेणार असल्याचे राज्यपाल कोश्यारी म्हणाले. दरम्यान, महापौर चेतन गावंडे, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके यांनीसुद्धा संबोधित केले. दर्यापूर येथील जे.डी. सांगळूदकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समारंभात स्वागतगीत गायिले. संचालन किशोर फुले व आभार प्रदर्शन दिलीप इंगाले  यांनी केले. 

भाऊसाहेबांच्या जन्मगावी भेटराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथे भेट दिली. यावेळी त्यांनी भाऊसाहेबांचे जन्मस्थळ असलेल्या वाड्याची पाहणी केली. कुटुंबातील सदस्य रजनी भीमराव देशमुख, कुसुमताई देशमुख, महेंद्र देशमुख, अनुप्रीता देशमुख, विद्यानंद देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यपालांनी भाऊसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. पापळ येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळेला भेट दिली व नियोजित कृषी महाविद्यालयाच्या जागेची पाहणी केली. यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आ. प्रताप अडसड, जिल्हाधिकारी पवनीत कौर, संस्थेचे सचिव शेषराव खाडे, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले आदी उपस्थित होते.

भाऊसाहेबांचा भारतरत्न देऊन सन्मान करादेशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषी आणि शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली आहे. राज्यात दुसऱ्या दुसऱ्या क्रमांकाची श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून त्याद्वारे गाव, खेड्यात शाळा, महाविद्यालयांची निर्मिती केली. बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे केंद्र सरकारने डॉ. भाऊसाहेबांना ‘भारतरत्न’ उपाधीने सन्मानित करावे, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी प्रास्ताविकातून केली.

 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीagricultureशेती