शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

जुलैच्या पहिल्या आठवड्यात कृषिजागृती

By admin | Updated: June 22, 2016 00:17 IST

कृषिविषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी १ ते ७ जुलैदरम्यान कृषिजागृती सप्ताह साजरा केला जाणार आहे.

अमरावती : कृषिविषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी १ ते ७ जुलैदरम्यान कृषिजागृती सप्ताह साजरा केला जाणार आहे. राज्यात कृषी विकासदरात वृद्धी करण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येतात. त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कृषी विभागाकडे आहे.राज्यातील कृषी विद्यापीठे, केंद्रीय संशोधन संस्थांनी संशोधित केलेले अद्यावत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावात कृषी पथक जाईल. अद्ययावत कृषी तंत्रज्ञान गाव खेड्यांपर्यंत जाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली जाईल. कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्रे, कृृषी विज्ञान केंद्र, सर्व कृषी महाविद्यालये, कृषी तंत्रनिकेतन, साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या, महाबीज, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, कृषी पणन मंडळ, राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँका हे सर्व घटक यात सहभागी होतील. शेतकरी मित्र, शेतकरी गटांचे प्रतिनिधी, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना कृषिजागृती सप्ताहात सहभाग करून घ्यावा, असे निर्देश कृषी विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. कृषी सप्ताह साजरा करण्याची जबाबदारी कृषी आयुक्त पुणे यांच्याकडे आहे. केंद्र व राज्य स्तरावर राबविण्यात येणारे शेतकरी पूरक योजना गावात पोहोचविण्यास हा सप्ताह लाभकारी राहील.