शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
2
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
3
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
4
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
5
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
6
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
7
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
8
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
9
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
10
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
11
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
12
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
13
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
14
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
15
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
16
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
17
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
18
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
19
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...

आजी-माजी नगरसेवकांचे खड्ड्यांत झोपून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 10:33 PM

अमरावती-बडनेरा मुख्य मार्गाची साहील लॉनसमोर दैनावस्था झाली आहे. त्यामुळे आजी-माजी नगरसेवकांनी बुधवारी खड्ड्यांतील पाण्यात झोपून आंदोलन केले व प्रशासनाला गंभीर इशारा देत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली.

ठळक मुद्देबडनेरा मार्गावरील खड्डे बुजवा : प्रशासनाला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : अमरावती-बडनेरा मुख्य मार्गाची साहील लॉनसमोर दैनावस्था झाली आहे. त्यामुळे आजी-माजी नगरसेवकांनी बुधवारी खड्ड्यांतील पाण्यात झोपून आंदोलन केले व प्रशासनाला गंभीर इशारा देत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली.बडनेरापासून थोड्याच अंतरावर या ठिकाणी रस्ता खराब आहे. गेल्या पाच वर्षांपासून स्थिती ‘जैसे थे’ आहे. तेथे पुरेशी प्रकाश व्यवस्थादेखील नाही. त्यामुळे दिवसआड या ठिकाणी अपघात घडत आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक जावेद मेमन अभिनव आंदोलन केले. याप्रसंगी नगरसेवक प्रकाश बनसोड, ललित झंझाड, इम्रानसह इतरही लोक उपस्थित होते. उद्या शेकडो लोकांना घेऊन आंदोलन सुरू ठेवू, असा इशारा भाजप प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी साबांविच्या अधिकाऱ्यांना दिला.प्रशासन झोपेतचमुख्य मार्गावरील अर्ध्या किलोमीटरच्या टप्प्यात रस्ता आहे की नाही, अशी अवस्था आहे. या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. अनेक अपघात खड्ड्यांमुळे घडलेत. असे असतानाही प्रशासन झोपेत आहे का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. लोकप्रतिनिधींनीदेखील लक्ष देण्याची गरज आहे.जीवघेण्या खड्ड्यांची दुरूस्ती प्रशासनाने तात्काळ करावी. नागरिक त्रस्त झाले आहेत. एखाद्याचा जीव गेल्यावर जाग येईल का? आंदोलन तीव्र करू.- जावेद मेमन, माजी नगरसेवक