शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘न्हाइ’च्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध वनगुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:48 IST

वरूड वनपरिक्षेत्र हद्दीतील पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीटीकरणात राखीव, संरक्षित क्षेत्रातील सुमारे ३०९ वृक्ष अवैधरीत्या कापल्याप्रकरणी अकोला येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय - न्हाइ) चे कार्यकारी अभियंता आर.बी. झाल्टे यांच्याविरुद्ध वनगुन्हा नोंदविला आहे.

ठळक मुद्देराखीव वनातील अवैध वृक्षकटाई: ४५ लाखांचे लाकूड जप्त; पर्यावरण परवानगीला खो

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: वरूड वनपरिक्षेत्र हद्दीतील पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीटीकरणात राखीव, संरक्षित क्षेत्रातील सुमारे ३०९ वृक्ष अवैधरीत्या कापल्याप्रकरणी अकोला येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय - न्हाइ) चे कार्यकारी अभियंता आर.बी. झाल्टे यांच्याविरुद्ध वनगुन्हा नोंदविला आहे. हे वृक्ष कापताना पर्यावरण खात्याची परवानगी घेण्यात आली नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.वरूड-पांढुर्णा हा रस्ता राखीव वनांतून जात असला तरी रस्त्याचा उजवा भाग हा सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या ताब्यात दिला आहे. मात्र, वृक्षांची मालकी ही वनविभागाची आहे. असे असताना केंद्र सरकारची पूर्वपरवानगी न घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राखीव, संरक्षित क्षेत्रातील ३०९ झाडे अवैधरीत्या कापली आहेत. ही बाब वरूड वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच कार्यकारी अभियंता झाल्टे यांच्याविरुद्ध १६ जानेवारी रोजी प्राथमिक वनगुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावरून इमारती, बल्ली, जळाऊ असे एकूण ८९ घनमीटर सागवान लाकूड जप्त केले आहे. त्याचे बाजारमूल्य ८९ लाख रुपये असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. महामार्गालगत वृक्षाचे मूल्यांकन व मोजणी वनविभागाने केली. त्यानंतर वृक्षाचे मूल्यनिर्धारण करण्यात आले. त्यानुसार त्याच परिक्षेत्रातून वृक्ष कापण्याची परवानगी दिली गेली. मात्र, वृक्ष कापण्याची प्रक्रिया आटोपल्यानंतर पुसला- चांदुरी मार्ग राखीव वनांतून जात असल्याचे वनाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानुसार वृक्ष कापण्यात आलेल्या घटनास्थळाचे वनविभागाने नकाशे तपासले. मोजणीसाठी पीडीए यंत्र असताना अवैधरीत्या वृक्ष कापल्याचे वनाधिकाऱ्यांच्या निदर्शनास येऊ नये, ही बाब आर्श्चयकारक मानली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते निर्मिती कंत्राटदारांना कशाच्या आधारे राखीव वनक्षेत्रातून वृक्ष कापण्याची परवानगी दिली, याबाबत शंका उपस्थित होत आहे.वनअधिनियम संवर्धन तरतुदीचा भंग...: वरूड-पांढुर्णा या महामार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरणास प्रारंभ करण्यापूर्वी राखीव वनक्षेत्रातील वृक्ष अवैधरीत्या कापण्यात आल्याप्रकरणी वनसंवर्धन अधिनियम १९८०, भारतीय वनअधिनियम १९२७ आणि जैवविविधता अधिनियम २००२ मधील अनेक तरतुदींचे उल्लंघन झाले आहे. मात्र, न्हाइच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध वनगुन्हा नोंदविताना भारतीय वन अधिनियमांचा उलेख करण्यात आलेला नाही.वरुड-पांढुर्णा महामार्ग सिमेंट काँक्रीटीकरणात काही वृक्ष कापल्याप्रकरणी प्राथमिक वनगुन्हा नोंदविला आहे. वनविभागाने तसे कळविले असून, कापल्या गेलेल्या वृक्षांची हद्दीची मालकी स्पष्ट करण्याचे सांगितले आहे.- आर.बी. झाल्टेकार्यकारी अभियंता,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अकोला.