जिल्ह्यात सर्वत्र गोवंशाची वाहतूक केली जाते व अमानुषपणे कत्तल केली जात आहे. याला पोलीस यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. या प्रकाराला कारणीभूत असलेल्या पोलिसांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यापूर्वीच वटणीवर आणले असते, तर तीन जणांचे प्राण वाचले असते. काहीही दोष नसताना नागरिकांचे जीव जात आहे, याला जिल्हा पोलीस अधीक्षकदेखील दोषी असल्याचा रोष सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. पुन्हा अशा घटना घडू नये, असे उपस्थितांकडून निक्षूण सांगण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षकांविरुद्ध उफाळला रोष
By admin | Updated: July 22, 2016 00:32 IST