शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

पुन्हा एखादा ‘विजय’ हिरावू नये म्हणून...!

By admin | Updated: November 18, 2015 00:15 IST

‘आमचे घर उद्ध्वस्त झालेय, मुलांचे पितृछत्र हरपलेय, आम्ही निराधार झालोय, आता मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी जगायचे आहे.

नीता नकाशेंची कळकळ : न्यायासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणारअमरावती : ‘आमचे घर उद्ध्वस्त झालेय, मुलांचे पितृछत्र हरपलेय, आम्ही निराधार झालोय, आता मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी जगायचे आहे. मात्र, ज्यांच्या अरेरावी आणि मुजोरीने सरांचा बळी घेतला, त्यांच्यावर जरब बसावी आणि यानंतर कोणत्याही शिक्षकाचा‘विजय नकाशे’ होऊ नये, यासाठी ‘त्या’ दोषी आमदारांसह सर्व अधिकाऱ्यांना कडक शासन व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत, अशी बांधिलकी मृत विजय नकाशे यांच्या पत्नी नीता नकाशे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. नकाशे सरांच्या आत्महत्येचा प्रश्न राज्यस्तरावर गाजतो आहे. खासदार, आमदारांनी आमच्या कुटुंबाची भेट घेतली. मात्र, अद्यापही पीआरसीवर गुन्हा दाखल झालेला नाही. या पीआरसी सदस्यांवर गुन्हा नोंदवून कडक कारवाई करावी, अशी मागणी नीता नकाशे यांनी लावून धरली आहे. निर्दोष शिक्षकाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचे काहीच वाकडे होऊ शकत नाही, असा संदेश या घटनेतून जायला नको, अशी कळकळ नीता नकाशे यांनी व्यक्त केली. त्या पुढे म्हणाल्या, आतापर्यंत नोकरीची गरज भासली नाही. मात्र, आता मुलांच्या भवितव्यासाठी नोकरी करावीच लागेल. तशी मानसिकता तयार केली आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च शासनाने उचलावा, अशी आग्रही मागणीसुद्धा नीता नकाशे यांनी केली आहे. २००१ साली सून म्हणून नीता या नकाशे कुटुंबात आल्या. पतीच्या निधनानंतर त्यांच्यावर १४ वर्षीय विनित आणि १२ वर्षीय नवेन या दोन मुलांची जबाबदारी आली आहे. वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी पीआसीच्या धसक्याने नीता यांच्या पतीचा बळी घेतला. ‘तो’ निरोप शेवटचाच !५ नोव्हेंबरला पीआरसी येणार म्हणून विजय नकाशे २ नोव्हेंबरला म्हणजे सोमवारी सेमाडोहकडे रवाना झाले. त्या दिवशी पहाटे ६ वाजता नीता यांनी त्यांना शेगाव नाक्यावर सोडले. तीच त्यांची शेवटची भेट ठरली. सेमाडोहमध्ये मोबाईलला रेंज मिळत नसल्याने संपर्कही झाला नाही. त्यानंतर थेट ७ नोव्हेंबरला त्यांचे पार्थिवच पाहायला मिळाले. २ नोव्हेंबरपासून संवादच झाला नाही. सहाव्या दिवशी त्यांचे पार्थिवच समोर आल्याचे सांगताना नीता नकाशेंना अश्रू आवरत नव्हते. पप्पा शाळेत गेलेत!नकाशे दाम्पत्याची विनीत आणि नवेन ही दोन्ही मुले त्यांच्या पप्पांच्या मृत्यूबाबत अनभिज्ञ आहेत. पप्पा देवाघरी गेल्याची सुतराम कल्पना सुध्दा त्यांना नाही. पप्पा शाळेत गेलेत, शनिवारी संध्याकाळी परत येतील, असा त्यांना अद्यापही विश्वास आहे.