शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

पुन्हा नऊ, कोरोना @२१२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:01 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेच्या अहवालानुसार अंबागेट येथे ३० वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. फ्रेजरपुरा भागात ४० व २५ वर्षीय महिला, रतनगंजमध्ये ४८ वर्षीय महिला व २९ वर्षीय पुरुष व सद्यस्थितीत कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मसानगंज येथे एकाच कुटुंबातील ८० वर्षीय वृद्धासह ५४ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

ठळक मुद्देअंबागेट भागात संक्रमण रतनगंज, फ्रेजरपुरातही वाढताहेत कोरोनाग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाचे संक्रमण रोज नव्या भागात होत आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत नऊ पॉझिटिव्हची नोंद झाली. अंबागेट या नव्या भागात कोरोनाग्रस्ताचा शिरकाव झाल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २१२ वर पोहोचली आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेच्या अहवालानुसार अंबागेट येथे ३० वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. फ्रेजरपुरा भागात ४० व २५ वर्षीय महिला, रतनगंजमध्ये ४८ वर्षीय महिला व २९ वर्षीय पुरुष व सद्यस्थितीत कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मसानगंज येथे एकाच कुटुंबातील ८० वर्षीय वृद्धासह ५४ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. सायंकाळी फ्रेजरपुरा येथीलच २२ व २८ वर्षीय तरुणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.फ्रेजरपुऱ्यात शनिवारी चार कोरोनाग्रस्ताची नोंद झाली. या भागात आता रुग्णसंख्या आठ झाली आहे. येथे अवैध धंद्यांमुळे वर्दळ असल्याची काही तक्रारी प्रशासनाकडे गेल्या आहेत. त्यादृष्टीने कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी सांगितले. मसानगंज या कंटेनमेंटमध्ये लवकरच नियंत्रण मिळविले जाईल. या ठिकाणी आता नागरिक स्वत:हून समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले.ग्रामीण भागातील कंटेनमेंटमध्ये नव्याने रुग्ण नाहीत. त्यामुळे शिराळा, परसापूर व कांडली हे कंटेनमेंट दोन दिवसांत निरस्त होणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. अन्य जिल्हे व राज्यातून अनेक जण येत आहेत. गृह विलगीकरणात लहान घरांमुळे अडचण आल्यास तसे कळवावे. जिल्ह्यात उपलब्ध विलगीकरण कक्षात ते राहू शकतात, असे जिल्हाधिकारी म्हणाले.चार जण ‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतरच्या दहा दिवसांत लक्षणे नसल्यामुळे शनिवारी चार महिला रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये हबीबनगरातील ४२ वर्षीय, वलगाव रोडवरील ३९ वर्षीय, हनुमाननगरातील ३८ वर्षीय तसेच लालखडी येथील २५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. शासनाच्या गाइड लाइननुसार पॉझिटिव्ह रुग्णाला दाखल झाल्याच्या पहिल्या पाच दिवसांत औषधाचा कोर्स दिला जातो व नंतरचे पाच दिवस निरीक्षण केले जाते. कुठलीही लक्षणे नसल्यास रुग्णांना डिस्चार्ज दिला जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या