शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

पुन्हा चार : कोरोना शंभरीकडे, एकूण ९४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:01 IST

वरूड येथील ३७ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, ती यापूर्वीच्या वरूड येथील पॉझिटिव्ह आढळलेल्या ‘त्या’ महिलेची मैत्रिण असल्याची माहिती आहे. आता वरूड येथे कोरोनाग्रस्तांची संख्या ३ झाली आहे. ती महिला हल्ली क्वारंटाईन आहे. लालखडी येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ती व्यक्ती सारी आजाराच्या उपचारासाठी सुपर स्पेशालिटीत दाखल होती. आता संपर्कातील व्यक्तीचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

ठळक मुद्देतीन महिला, एक पुरुष पॉझिटिव्ह : कोविड रूग्णालयात हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात कोरोना विषाणू झपाट्याने पसरत आहे. शुक्रवारी तीन महिला व एक पुरुष पॉझिटिव्ह आल्याने कोरोना ग्रस्तांची संख्या आता ९४ वर पोहोचली आहे. दरदिवशी वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या बघता आता अमरावतीची शंभरीकडे वाटचाल सुरू झालेली आहे. येथील उत्तमनगरात पहिल्यांदाच ४२ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हा परिसर महापालिकेने कंटेनमेंट झोन घोषित केला आहे.वरूड येथील ३७ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, ती यापूर्वीच्या वरूड येथील पॉझिटिव्ह आढळलेल्या ‘त्या’ महिलेची मैत्रिण असल्याची माहिती आहे. आता वरूड येथे कोरोनाग्रस्तांची संख्या ३ झाली आहे. ती महिला हल्ली क्वारंटाईन आहे. लालखडी येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ती व्यक्ती सारी आजाराच्या उपचारासाठी सुपर स्पेशालिटीत दाखल होती. आता संपर्कातील व्यक्तीचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.स्थानिक मसानगंज येथील ६० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेने १३ मे रोजी येथील खासगी डॉक्टरकडे ताप असल्यामुळे उपचार घेतला. मात्र, या महिलेला सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे होती. त्यामुळे त्या खासगी डॉक्टरने त्यांना इर्विन रुग्णालयात पाठविले होते. तेथे त्यांचा स्वॅब घेण्यात आला. स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यांना कोविड रुग्णालयात हलविले आहे. आता मसानगंजमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७ झाली आहे.

  1. उत्तमनगर येथील ४२ वर्षीय महिला ही पीडीएमसीमध्ये सफाई कामगार असल्याची माहिती आहे. त्यांना कोविड रुग्णालयात हलविले आहे. त्या महिलेच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध, स्वॅब घेण्याची प्रक्रिया आरोग्य यंत्रणेने चालविली आहे. ७ दिवसांपूर्वी एक व्यक्ती पीडीएमसीमध्ये उपचारासाठी आली होती. नंतर ती व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली. त्या व्यक्तीच्या संपर्कातील सहा आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रबोधिनीमध्ये क्वांरटाईन करून त्यांचे स्वॅब घेण्यात आले. यात ती महिलासुद्धा होती, अशी माहिती आहे. पहिल्यांदाच उत्तरनगर भागात कोराना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने हा परिसर कंटेनमेंट झोन घोषित केला आहे. या परिसरात नागरिकांच्या आरोग्य तपासणीला गती येणार आहे. हा भाग सॅनिटाईझ करण्यासाठी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी आरोग्य यंत्रणेला निर्देश दिले आहेत.

लालखडी सिटीझन शाळा परिसर कंटेनमेंट झोनमहापालिका हद्दीतील लालखडी सिटीझन शाळेजवळील परिसर कोराना बाधित रूग्ण आढळल्याने कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. या भागात जाणारे मार्ग बंद झाले असून, सीमा सील केल्या आहेत. रेल्वे लाईनवरील उच्च दाब वीज वाहिनी, सरकार पॅलेस, गेट, रिंग रोड, म्हशीचा तबेल्यापासून ते उच्च दाब वीज वाहिनीपर्यंत, सिटीझन शाळेमागील नाली रेल्वे लाईन ते उच्च दाब वीज वाहिनीपर्यंत सीमा सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी निर्गमित केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या