जिल्ह्यात मंगळवारी २,७१५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३११ नमुने पॉझिटीव्ह आलेले आहेत. यामध्ये ११.१४ टक्के पॉझिटिव्हीटी नोंदविन्यात आलेली आहे. मागच्या आठवड्यात ७ ते १० टक्क्यांपर्यत नमुने पॉझिटिव्ह येत होते. परंतू आता पुन्हा एकदा यामध्ये एक्का वाढलेला आहे. होळी व धुळवडमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन झालेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हीटी वाढलेली आहे. मागच्या महिन्यात सहा हजारांपर्यत चाचण्या करण्यात येत होत्या. परंतू या याआठवड्यात पुन्हा नमुन्यांची संख्या कमी झाल्यचे दिसून येते.
कोरोनाची साखळी खंडीत व्हावी, याकरीता जिल्ह्यात लॉकडाऊन घोषीत करण्यात आलेले आहे. यामध्ये रात्री संचारबंदी व दिवसा जमावबंदी असतांना नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा विसर पडला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाद्वारा पुन्हा दंडनीय कारवाया सुरु करण्यात आलेल्या आहे.