शहरं
Join us  
Trending Stories
1
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
2
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
3
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
4
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
5
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
6
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
7
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
8
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
9
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
10
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
11
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
12
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
13
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
14
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
15
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
16
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
17
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
18
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
19
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
20
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला

नोटाबंदीनंतर तूरबंदी हे मोठे संकट

By admin | Updated: April 26, 2017 00:14 IST

शेतकऱ्यांजवळील शेवटचा तुरीचा दानाही शासन खरेदी करेल, अशी ग्वाही देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला.

तत्काळ तूर खरेदीची मागणी : विभागीय आयुक्तांच्या दालनात बच्चू कडूंचा ठिय्याअमरावती : शेतकऱ्यांजवळील शेवटचा तुरीचा दानाही शासन खरेदी करेल, अशी ग्वाही देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. जेवढी तूर खरेदी केली त्यापेक्षा अधिक तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. तूर खरेदी बंद, हे नोटाबंदीनंतरचे सर्वात मोठे संकट आहे, असा आरोप करीत आ. बच्चू कडू यांनी मंगळवारी विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांच्या दालनात ठिय्या दिला.केंद्रावर अद्याप अडीच लाख क्विंटल तूर मोजणीच्या प्रतिक्षेत आहे व यापेक्षा अधिक तूर शेतकऱ्यांच्या घरी आहे. खरीपाच्या तोंडावर शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. मुलांचे शिक्षण, घरातील लग्नकार्य कसे करावे या विवंचनेत शेतकरी आहे. अश्या परिस्थितीत शासनाने तूर खरेदी बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होणार आहे. शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न झालं, हे सरकारच्या डोळ्यात खुपते काय? असा सवाल आ. कडू यांनी केला.दोन महिने तुरीचे पेमेंट मिळत नाही, कधी बारदाना नाही तर कधी गोदामांची कमी, अशी किती कारणे सरकार सांगणार आहेत. ‘त्या’ शेतकऱ्यावर होणार गुन्हा दाखलअमरावती : जिल्ह्यात जितके तुरीचे उत्पादन झाले त्यापैकी ५० टक्के तूर व्यापाऱ्यांनी कमी भावाने खुल्या बाजारात खरेदी केली. साडेतीन लाख क्विंटल शासकीय तूर केंद्राद्वारे खरेदी केली व साधारणपणे तेवढीच तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. केंद्रावर महिना-महिना शेतकऱ्यांची तूर मोजणी होत नाही. मात्र व्यापाऱ्यांची या अवधीत कित्येक वेळा तूर खरेदी केल्या जाते असा आरोप आ. कडू यांनी केला. जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्रावरील तुरीची खरेदी केली जाईल, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगताच आ. कडू यांनी ठिय्या आंदोलनाची सांगता केली. चांदूरबाजार येथील तूर खरेदी केंद्रावर एका शेतकऱ्याने एकाच सात-बारावर चार वेळा तूर विक्री केली. शेतकऱ्यांच्या नावाआड व्यापारी तूर विक्री करतात. आम्ही आंदोलन केले तर गुन्हे दाखल करता अन् व्यापाऱ्यांना मोकळं सोडता असे बोल आ. बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी के. आर. परदेशी यांना सुनावले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या शेतकऱ्यांवर तत्काळ एफआयआर दाखल करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)- तर मंत्र्याच्या घरी तुरीचे कुटार नेऊशासकीय तूर खरेदी केंद्रावरील तुरीची तत्काळ खरेदी करा या मागणीसाठी मंगळवारी विभागीय आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले व नंतर शासनाने शेतकऱ्यांची तूर खरेदी केली नाही, तर तुरीचे कुटार मंत्र्याच्या घरात नेऊन टाकू, हा आंदोलनाचा दुसरा टप्पा राहील, अशी माहिती आ. बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना दिली. व्यापाऱ्यांची गोदामे तपासण्याच्या सूचनाव्यापाऱ्यांनी कमी भावाने खुल्या बाजारातून तुरीची खरेदी केली व हीच तूर हमी भावाने शासनाला विकत आहे. यासाठी व्यापाऱ्यांच्या गोदामातील तुरीची पडताळणी करावी. तसेच शेतकऱ्यांच्या घरी किती तूर पडून आहे याची माहिती जाणून घ्यावी. जेणेकरून शेतकऱ्यांकडील तुरीचा अंदाज येईल, अशी सूचना आ. कडू यांनी विभागीय आयुक्तांना केली.