शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अखेर "तो" रस्ता होणार दुरुस्त

By admin | Updated: April 28, 2017 00:09 IST

तालुक्यातील ममदापूर, इसापूर, काटसूर, सुलतानपूरच्या १३ ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्ती व शेतकरी हिताच्या

आंदोलनाची फलश्रुती : जि.प.सभापती, सदस्यांची मध्यस्थी तिवसा : तालुक्यातील ममदापूर, इसापूर, काटसूर, सुलतानपूरच्या १३ ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्ती व शेतकरी हिताच्या विविध प्रश्नांसाठी ग्रा.पं. सदस्य मुुकुंद पुनसे यांच्या नेतृत्वात सोमवारी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन अखेर मंगळवारी सुटले. संबधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले. ममदापूर, इसापूर, सुल्तानपूर, काटसूर, फत्तेपूर या गावांशी संबंधित विविध समस्यांसाठी मुकुंद पुनसे, त्रिशूल वानखडे, सुरेंद्र इंगळे, शरद देशमुख, श्रीधर इंगळे, शकील शहा, अंकुश बोके, सतीश शिंदे, पवन इंगळे, गौरव इंगळे, अजय बोके, हैबतराव गाडगे, नितीन मसलदी या नागरिकांनी २४ एप्रिल रोजी इसापूर मार्गावर बेमुदत उपोषण सुरू केले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता खराब झाल्याने गावकऱ्यांचे कमालीचे हाल होत आहेत. आंदोलनकर्त्यांनी २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ममदापूर-इसापूर मार्गावर खड्ड्यात बेशरमचे झाड लावून प्रशासनाचा निषेध केला. त्यानंतर गावकऱ्यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाची दखल घेत जि.प.बांधकाम सभापती जयंत देशमुख व या भागातील नवनियुक्त जि.प.सदस्य अभिजित बोके यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. चर्चा करीत अधिकाऱ्यांनी मार्ग काढला व सदर रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी तहसीलदार राम लंके, पं.स.सदस्य लुकेश केने, संबधित विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)