शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

अखेर महिला शेतकऱ्यासमोर झुकले प्रशासन

By admin | Updated: June 16, 2017 00:07 IST

शेती वहिवाटीच्या रस्त्यासंदर्भात प्रशासनाने चुकीचा निर्णय दिल्याने आधीच हृदयविकाराने त्रस्त शेतकऱ्यासमोर

न्यायाचा लढा : वहिवाटीच्या रस्त्याचा होता वाद मनोज मानतकर। लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : शेती वहिवाटीच्या रस्त्यासंदर्भात प्रशासनाने चुकीचा निर्णय दिल्याने आधीच हृदयविकाराने त्रस्त शेतकऱ्यासमोर जीवन-मरणाचा प्रश्न उभा ठाकला. मात्र, त्यांच्या सहचारीणीने त्यांची साथ सोडली नाही. ती पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्यासाठी तिने वर्षभर शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवून ही लढाई त्या जिंकल्या. अखेर महिला शेतकऱ्याच्या चिकाटीपुढे प्रशासनाला झुकावेच लागले. या लढ्यात सदर महिला शेतकऱ्याला स्थानिक नगरसेविका कल्पना मारोटकर यांनीदेखील सहकार्य केले. अखेर वहिवाटीच्या रस्त्याबाबत प्रशासनाने दिलेला चुकीचा आदेश रद्द केला. त्यामुळे या शेतकरी कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. विस्तृत माहितीनुसार, नांदगाव खंडेश्वर येथील रहिवासी दिलीप व कुसूम काकडे या दाम्पत्याची मौजा धारवाडी शेत सर्वे नं. १२/१ क मध्ये १ हेक्टर ६२ आर. शेतजमीन आहे. काही अंतरावर एका व्यावसायिकाची जमीन आहे. या व्यावसायिकाने या जमिनीवर पेरणी करताना काकडे दाम्पत्याची कोणतीच परवानगी न घेता त्यांच्या शेतातून ट्रॅक्टरची वाहतूक केली. याबाबत काकडे यांनी त्यांना विचारणा केली असता प्रशासनानेच तशी परवानगी दिल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे काकडे दाम्पत्याच्या शेतीची बरीच हानी झाली. त्यांच्या शेतातील पीक नष्ट झाले. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकरी कुटुंबाने तहसील प्रशासनाकडे धाव घेतली. परंतु निगरगट्ट प्रशासनाने या कुटुंबाला टोलवाटोलवीची उत्तरे देऊन वारंवार बोळवण केली. प्रशासनाच्या या तुघलकी निर्णयामुळे आधीच हृदयविकाराने आजारी असलेल्या दिलीप काकडे यांची प्रकृती खालावली असताना मात्र, त्यांच्या पत्नी कुसूम काकडे यांनी पतीचा हा लढा पुढे सुरूच ठेवला. महिला मैदानात उतरल्याने हा लढा चिघळणार हे लक्षात येताच प्रशासनाने वहिवाटीच्या रस्त्याबाबत दिलेला निर्णय रद्द करीत जोडधुऱ्यावरून फक्त बैलगाडीने रस्ता वाहिती करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. धनदांडग्यांच्या दबावात येऊन प्रशासन चुकीचा निर्णय देत असेल व गरीब कुटुंबावर अन्याय करीत असेल तर अन्यायाविरोधात लढणे हे आपले आद्य कर्तव्य ठरते. मीदेखील तेच केले.- कल्पना मारोटकर,नगरसेविका, वॉर्ड क्र.१