खरिपाची सुधारित पैसेवारी ४६ : १,९६७ गावांत दुष्काळस्थिती, विविध सवलतींचा मार्ग सुकरगजानन मोहोड अमरावतीखरिपाचे ३ लाख २० हजार हेक्टरमधील सोयाबीन उद्ध्वस्त झाले असताना जिल्हा प्रशासनाने १८ सप्टेंबरला ५९ पैसे जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यास दुष्काळी यादीतून वगळण्यात आले. याविरुद्ध जिल्ह्यात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. ‘लोकमत’ने लोकभावना रेटून धरली. अखेर जिल्हा प्रशासनाने शनिवारी खरिपाची ४६ ही सुधारित पैसेवारी जाहीर केली. आता जिल्हा दुष्काळग्रस्त असल्याची अधिकृत घोषणा लवकरच होईल. १ हजार ९६७ गावांमध्ये शासनाच्या सवलती मिळण्याचा मार्ग त्यामुळे सुकर होईल. शासनाचे १६ सप्टेंबरच्या आदेशान्वये ६७ पैशांपेक्षा कमी अधिक पैसेवारीच्या निकषानुसार जिल्ह्यात ५९ पैसे ही पैसेवारी १८ सप्टेंबरला घोषित करण्यात आली होती. ही दुष्काळजन्य स्थिती गृहित धरण्यात आली. मात्र एकाच आठवड्यात शासनाने निर्णय फिरविला. २३ सप्टेंबरला पैसेवारीचे सुधारित निकष मागे घेऊन प्रचलित ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी घोषित करण्याचा निर्णय घेतला.
अखेर जिल्हा दुष्काळग्रस्त !
By admin | Updated: November 8, 2015 00:16 IST