शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
2
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
3
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
4
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
5
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
6
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
7
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
8
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
9
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
10
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
11
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
12
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
13
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
14
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
15
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
16
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
17
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
18
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
19
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
20
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे

जिल्हाधिकारी उच्च न्यायालयाला पाठविणार प्रतिज्ञापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 22:59 IST

गर्ल्स हायस्कूलच्या आवारात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याच्या मुद्द्यावरून प्रशासकीय अधिकारी व लोकशाहिरांच्या अनुयायांमध्ये शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या दालनात सकारात्मक चर्चा झाली.

ठळक मुद्देअण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसविण्याचा मुद्दा : कृती समितीचे आंदोलन सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गर्ल्स हायस्कूलच्या आवारात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याच्या मुद्द्यावरून प्रशासकीय अधिकारी व लोकशाहिरांच्या अनुयायांमध्ये शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या दालनात सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेनंतर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी अण्णाभाऊंच्या अनुयायांनी घेतलेल्या ठरावाच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल, असे आश्वासन दिले.जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उच्च न्यायालयाला पाठविल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्राची प्रत मिळेपर्यंत लोकशाहिरांच्या अनुयायांचे धरणे सुरू राहील, असा पवित्रा घेतला. शुक्रवारी दुपारी लहुजी शक्ती सेना, भीम आर्मी व भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या पदाधिकाºयांनी जिल्हा कचेरीवर पुन्हा धडक दिली. पुतळा बसविण्याचा मुद्द्यावरून अनुयायांनी छेडलेले आंदोलन लक्षात घेता, जिल्हाधिकारी बांगर यांनी पोलीस आयुक्तांना चर्चेसाठी बोलावून घेतले. यादरम्यान अनुयायांनी जिल्हाधिकाºयांच्या कक्षासमोर ठिय्या मांडला होता. काही वेळातच जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, उपायुक्त चिन्मय पंडित, गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे व अन्य प्रशासकीय अधिकारी पोहोचले. अगोदर प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर लोकशाहीर यांचे अनुयायी चर्चेकरिता जिल्हाधिकारी यांच्या दालनात गेले. अनुयायांनी आपली बाजू मजबूत असल्याचे सांगून अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्यावर जोर दिला. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे सद्य:स्थितीत पुतळा बसविता येणार नसल्याची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. अण्णाभाऊ साठे व राणी दुर्गावती असे दोन्ही पुतळे आम्ही बसवू, सर्व प्रक्रिया पूर्ण करू, कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेऊ, असा ठराव अनुयायांनी वकिलामार्फत जिल्हाधिकाऱ्यांपुढे ठेवला. ठरावाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी दिले. गर्ल्स हायस्कूल चौकात १ आॅगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पूजनाचा कार्यक्रम घेऊ, तो कार्यक्रम शांततेत पार पाडू, अशी ग्वाहीही लोकशाहीर यांच्या अनुयायांनी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना दिली.उपायुक्त आले बाइकवरजिल्हाधिकाऱ्यांनी बोलविलेल्या बैठकीला उपायुक्त चिन्मय पंडित हे सहकाऱ्याच्या दुचाकीने पोहोचले. त्यानंतर विसेक मिनिटांनी त्यांचे शासकीय वाहन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाले. वडिलांना सोडण्यासाठी वाहन बडनेरा रेल्वे स्टेशनला गेले होते. ट्रेन ऐनवेळी लेट झाल्यामुळे परतण्यास उशीर झाला, अशी माहिती डीसीपींच्या वाहनचालकाने 'लोकमत'ला दिली.'वैयक्तिक घेऊ नका'जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश करताना मुद्दा वैयक्तिक घेऊ नका, अशी सूचना ठाणेदार मनीष ठाकरे यांनी लहुजी सेनेचे विदर्भाध्यक्ष रूपेश खडसे यांना केली. ठाकरे यांच्या निलंबनाची मागणी खडसे यांनीच ताकदीने रेटून धरली होती.