शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

सचिव ते शिपाई सर्वांचे केले औक्षण; ॲड. यशोमती ठाकूर यांनी स्टाफचा सत्कार करत घेतला निरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2022 11:11 IST

ठाकूर यांनी स्वत: औक्षण करत, शाल पांघरत प्रधान सचिव, खासगी सचिव, विशेष अधिकारी, पोलीस स्टाफ यांच्यापासून शिपाई, स्वयंपाकी, सुरक्षारक्षक यांचा सत्कार केला.

अमरावती : राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री तथा पालकमंत्री म्हणून यशस्वी कार्यभार सांभाळल्यानंतर गुरुवारी मुंबईतील मंत्रालयीन कार्यालयातील सहकाऱ्यांचा निरोप घेताना ॲड. यशोमती ठाकूर यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार केला. स्वत: औक्षण करत, शाल पांघरत प्रधान सचिव, खासगी सचिव, विशेष अधिकारी, पोलीस स्टाफ यांच्यापासून शिपाई, स्वयंपाकी, सुरक्षारक्षक यांचा सत्कार केला.

अतिशय भावपूर्ण वातावरण झाले असताना ॲड. ठाकूर म्हणाल्या की, आपण सर्वांनी गेली अडीच वर्षे दिलेली साथ मोलाची आहे. आपण सर्वांनीच सामान्यांना दिलासा देणारे निर्णय केले, जनतेच्या भल्याची कामे केली. आता अधिकारी, कर्मचारी असे नाते राहिले नाही तरी आपले ऋणानुबंध आयुष्यभराचे राहणार आहेत. मी कायम तुमच्या सोबत असेन, असेही ॲड. यशोमती ठाकूर यांनी आश्वस्त केले. तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरAmravatiअमरावती