अंबा फेस्टिव्हल : एकापेक्षा एक सरस नृत्याची पेशकशअमरावती : विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अंबानगरीत अंबा फेस्टिव्हलची धूम आहे. नवोदित कलाकारांनी विविध प्रकारचे मराठमोळ व दिलफेक नृत्यांचे सादरीकरण करून अमरावतीकरांनी रिझवले.श्री अंबा फेस्टिव्हल ट्रस्टच्या व केशव डान्स अकादमीच्या संयुंक्त विद्यमाने येथील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे नवोदित कलाकारांनी विविध गटांत शनिवारी अंबा डान्स टॅलेंट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.वैष्णवी ताकडे हिने सादर केलेल्या ‘मे अलबेली हू’ या गीतावर नृत्य सादर केले. प्रियंका टिकेकर हिने शास्त्रीय खास नृत्य सादर करून रसिकांना मंत्रमृग्ध केले. विक्री वाडके याने हनीसिंगच्या गितावर झल दाखविली. सोनल देशपांडे हिने सादर केलेल्या ‘तुम्हारे अदा पे में भारी भारी ’लय भारी ठरले. रणदीप व संस्कृती वाघोलकर यांनी रसिकांची मने जिंकली. विविध गटात कलाकारांनी सादर केलेल्या डांसने अमरावतीकरांचे मनोरंजन केले. विविध गटांत अनेकांनी सहभाग घेतला होता. वृत्त लिहिस्तोवर स्पर्धेचा निकाल लागला नव्हता. युरोप देशात भारताचे नाव ज्यांनी मुंबई व बिनदास नाच फेम सुभाष नायडू मुंबई डान्स स्पर्धेचे जजेस होते. यावेळी केशव डान्स अकादमीचे पदाधिकारी उपस्थित होते. याच कार्यक्रमात एक नवोदित कलाकाराला डावलण्यात आल्याने त्या कलाकाराने मंचावर जाऊन रसिकांसमोर टॅलेंट दाखविण्याची संधीमागीतली होती. त्यानंतर त्याने आपली कला सादर केली.
दिलफेक नृत्याने घेतल्या रसिकांच्या टाळ्या
By admin | Updated: October 19, 2015 00:36 IST