शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थी साधणार जगाशी संवाद, इंग्रजी भाषा संभाषणासाठी नवा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 18:26 IST

आदिवासी मुला-मुलींना जगाशी संवाद साधता यावा, यासाठी राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा संभाषणासाठी नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

गणेश वासनिकअमरावती : आदिवासी मुला-मुलींना जगाशी संवाद साधता यावा, यासाठी राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा संभाषणासाठी नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नव्या शिक्षण प्रणालीतून विज्ञाननिष्ठ विचारसरणीकडे आदिवासी विद्यार्थ्यांचा कल असेल, असा विश्वास आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.राज्याचा आदिवासी विकास विभाग म्हटला की, अपहार, भ्रष्टाचार, अनियमितता असाच कारभार सुरू असल्याचे चित्र आपसूकच नजरेसमोर येते. परंतु मनीषा वर्मा यांनी काही महिन्यांपूर्वी या विभागाची सूत्रे हाती घेताच गडबड अधिका-यांमध्ये आता काही खरे नाही? असे म्हणण्याचा प्रसंग ओढवला आहे. वर्मा यांनी आदिवासींच्या विकासासाठी योजना, उपक्रम सकारात्मकरीत्या राबविणार असल्याचे स्पष्ट केले. म्हणूनच द-या-खो-यात वास्तव्यास असलेल्या आदिवासींची मुले ही अन्य समूहाच्या तुलनेत शिक्षणात मागे राहू नये, त्यांच्यात आत्मविश्वास अन् आत्मसन्मान वाढावा, यासाठी अस्सल इंग्रजी भाषा संभाषणाचा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थी त्याचे लाभार्थी ठरणार आहेत. इंग्रजीतून संवाद, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, करियर गायडन्स, कौशल्य विकासाचे धडे, मार्केटिंग कौशल्य, आदिवासी महिलांना रोजगारासह कर्जपुरवठा, वनहक्क कायद्यांतर्गत जमिनींवर उत्पादन क्षमता वाढविणे, आश्रमशाळांमध्ये पायाभूत सुविधा, बालहक्क कायद्याची अंमलबजावणी, शाळा समितीला निधी खर्च करण्याची मुभा आदी विविध उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे. विशेषत: शिक्षक, कर्मचा-यांना प्रोत्साहन मिळावे, विद्यार्थी सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी आश्रमशाळांची आयएसओ मानांकन स्पर्धादेखील घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.तीन वर्षांत ४०० आश्रमशाळांमध्ये सायन्स मॉड्युल्सआदिवासी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानदृष्टी वाढावी आणि ज्ञानात भर पडावी, यासाठी राज्यात तीन वर्षांत ४०० आश्रमशाळांमध्ये सायन्स मॉड्युल्स हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. एकलव्य फाऊंडेशन व अन्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मॉड्युल्सप्रमाणे १० ते १५ शाळांची निवड केली जाईल. या उपक्रमाचे मेळघाटातील शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. शिक्षकांनी साकारलेले सायन्स मॉड्युल्स स्वत: आदिवासी विद्यार्थी किटस् हाताळतील. ते विज्ञानाचे धडे घेतील, असा प्रयोग पहिल्यांदाच ट्रायबलमध्ये सुरू झाल्याचे मनीषा वर्मा म्हणाल्या. ट्रायबलमध्ये रूटीन योजना सुरूच आहे. परंतु आदिवासींचा आर्थिकस्तर उंचवावा आणि रोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत तसेच महिला बचत गटाला कर्जपुरवठा आणि व्यवसायास संधी आदी नवीन उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.- मनीषा वर्माप्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र

टॅग्स :Amravatiअमरावती