शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्याला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:35 IST

शहरातील ख्रिश्चन मिशनरीच्या वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्याला तेथील कर्मचाऱ्याने गुरुवारी रात्री १० च्या सुमारास बेदम मारहाण केली. त्या मारहाणीचे वळ विद्यार्थ्याच्या शरीरभर उमटले आहेत. विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. या कर्मचाºयास धारणी पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देअंगभर उठले वळ : ख्रिश्चन मिशनरीच्या वसतिगृहातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : शहरातील ख्रिश्चन मिशनरीच्या वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्याला तेथील कर्मचाऱ्याने गुरुवारी रात्री १० च्या सुमारास बेदम मारहाण केली. त्या मारहाणीचे वळ विद्यार्थ्याच्या शरीरभर उमटले आहेत. विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. या कर्मचाºयास धारणी पोलिसांनी अटक केली आहे.आनंद सावलकर असे कर्मचाऱ्याचे, तर राजेंद्र सुकराम बेठेकर (१३) असे मारहाण झेलणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्याचे नाव आहे. तक्रारीनुसार, तारुबांदा येथील राजेंद्र हा धारणी येथे जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत सहावीचा विद्यार्थी तेथीलच ख्रिश्चन मिशनरी वसतिगृहात वास्तव्यास आहे. गुरुवारी रात्री १० च्या सुमारास राजेंद्र व त्याचा मित्र हे दोघे खेळत होते. अचानक आलेल्या आनंद सावलकर याने त्याला तेथे पडून असलेल्या झाडूने मारले. सोबतच्या दोन-तीन विद्यार्थ्यांनाही मारहाण केली. यानंतर आनंदने राजेंद्रला त्याच्या रूममध्ये नेऊन दरवाजा बंद केला आणि चामड्याच्या बेल्टने बेदम मारहाण केली. वाच्यता केल्यास आणखी मारेन, असेही धमकावले.आदिवासी विद्यार्थी शुक्रवारला सकाळी नियमित शाळेत आले. मात्र, मुख्याध्यापिका रामकु जावरकर व शिक्षकांना राजेंद्रच्या हालचालींवर संशय आला. त्याच्याकडून खाली बसणे वा उठणे होत नव्हते. त्यानंतर मुख्याध्यापिका व शिक्षकांनी त्याची चौकशी असता, रात्री घडलेला प्रकार त्याने कथन केला. शिक्षकांनी त्याच्या शरीराची पाहणी केली तेव्हा बेदम मारहाणीत उठलेले वळ दिसले. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका रामकु जावरकर यांनी तात्काळ गटशिक्षणाधिकारी बंडू पटेल यांना माहिती दिली. त्यांनी दिया गावातील राजेंद्रचे मामा रामदास कासदेकर यांना बोलावून घेतले आणि धारणी पोलिसांत तक्रार देण्याचे सांगितले.विद्यार्थ्याला अमानुष मारहाणीची तक्रार नोंदवून घेतली. आरोपीला अटक केली आहे. मिशनरी वसतिगृह प्रशासनाचीही चौकशी होेईल.- विलास कुलकर्णीपोलीस निरीक्षक, धारणीआणखी किती विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली, यासाठी वसतिगृह प्रशासनाची चौकशी करू न कारवाई करण्यात येईल.- बंडू पटेलगटशिक्षणाधिकारी, धारणी