शहरं
Join us  
Trending Stories
1
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
2
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
3
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
4
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
5
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
6
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
7
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
8
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
9
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
10
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
11
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
12
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
13
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
14
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
15
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
16
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
17
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
18
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
19
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
20
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...

१६ लाखांसाठी अडले फिडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिखलदरा : चौऱ्यामल गावाला नजीकच्या अडीच किलोमीटर अंतरावरून शहानूर धरणानजीकच्या विहिरीतून पाणी पुरवठा होतो. त्या विहिरीवर ...

ठळक मुद्देडीपीसीकडे आर्जव : चौऱ्यामल गावात पावसाळ्यात पाणीटंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : चौऱ्यामल गावाला नजीकच्या अडीच किलोमीटर अंतरावरून शहानूर धरणानजीकच्या विहिरीतून पाणी पुरवठा होतो. त्या विहिरीवर दहा एचपीचे दोन मोटरपंप आहेत. विद्युत पुरवठयाअभावी ते कुचकामी ठरले आहेत. विद्युत विभागाने गाव फिडर वरून पुरवठा करण्यासठी १६ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. एवढी रक्कम ग्रामपंचायतीकडे नसल्याने तो निधी जिल्हा नियोजन समितीने द्यावा, अशी मागणी आहे.तर दुसरीकडे कोट्यवधी रुपयांचा आदिवासी विकासाच्या नावावर येणारा निधी इतरत्र वळविलो जातो. त्या लोकप्रतिनिधींना तहानलेले आदिवासी दिसू नयेत, यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. चौऱ्यामल गावात विहीर आहे. विहिरीत भरपूर पाणी सुद्धा आहे. विहिरीवर मोटर पंप आहे. पाणी साठवणूक करण्यासाठी पाण्याची टाकी सुद्धा आहे. टाकीत पाणी चढविण्यासाठी विद्युत पुरवठा सुद्धा करण्यात आला आहे. मात्र तरीसुद्धा हे गाव तहानले असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने लोकदरबारात मांडले आहे. वीज पुरवठा चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने डोळ्यादेखत पाणी असतानाही आदिवासींना नदी नाल्याचे गढूळ पाणी प्यावे लागत आहे. यासंदर्भात अनेकदा पत्रव्यवहार करूनही महावितरण प्रशासन् काही ऐकत नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दयाराम काळे, सरपंच राजेश जावरकर यांनी साकडे घातले आहे. तर खोज समाजिक संस्थेचे बंड्या साने व आदिवासी नागरिकांनीही येथील पाणीटंचाईचा मुद्दा उचलून धरला आहे.पालकमंत्र्यांना फक्त एवढीच मागणीपावसाळ्यात संपुर्ण गावाला डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नदीनाल्यातील गढूळ पाणी घेऊन गाव गाठावे लागते. यात घरातील जेष्ट, बालक, तरूण, तरूणीला पायपीट करावी लागत आहे. गढूळ पाणी पिऊन अतिसार होण्याची भीती आहे. कृषीपंपाच्या फिडरवरचा पाणीपुरवठा गावठाण फिडरवर करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांचे कान टोचावे आणि आम्हाला पाणी द्यावे, अशी मागणी सरपंच राजेश जावरकर यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात