शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त एफएसआय लागू होणार

By admin | Updated: May 29, 2015 00:34 IST

महापालिका उत्पन्नात वाढ करण्यासाठी शहरात अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) लागू करण्याबाबत सांगोपांग चर्चा झाली.

अमरावती : महापालिका उत्पन्नात वाढ करण्यासाठी शहरात अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) लागू करण्याबाबत सांगोपांग चर्चा झाली. परंतु एफएसआय कोणत्या दराने मंजूर करावे, यासाठी बिल्डर्स व्यावसायीक, वास्तुशिल्पकार, तज्ज्ञांशी चर्चा करून शहरवासियांचा विचार करुनच दर ठरविण्याचा निर्णय गुरुवारी विशेष सभेत घेण्यात आला. याविषयावर पुन्हा विशेष सभा होईल, असे निर्देश महापौरांनी दिलेत.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर चरणजितकौर नंदा यांच्या पीठासीनाखाली विकास नियंत्रण नियमावलीमध्ये अधिमूल्य आकारुन अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय करण्याबाबत विशेष सभेचे आयोजन गुरुवारी करण्यात आले. या सभेला प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी किरण गित्ते, नगरसचिव मदन तांबेकर उपस्थित होते. नगरविकास विभाग, मंत्रालयाने मंजूर केलेला वाढीव एफएसआय लागू करण्याबाबतच्या शासकीय प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. यावेळी महापालिका उत्पन्नात वाढ करण्याच्या अनुषंगाने मुद्दे मांडताना स्थायी समिती सभापती विलास इंगोले, पक्षनेता बबलू शेखावत, गटनेता अविनाश मार्डीकर, नगरसेवक दिगंबर डहाके, बाळासाहेब भुयार, अजय गोंडाने, प्रदीप बाजड, प्रवीण हरमकर, वसंतराव साऊरकर, अरुण जयस्वाल, संजय अग्रवाल, चेतन पवार, विजय नागपूरे, जयश्री मोरे, मिलिंद बांबल, सुजाता झाडे, दीपक पाटील, भूषण बनसोड, सुनील काळे, हमीद शद्दा, अर्चना इंगोले आदी सदस्यांनी काही तांत्रिक मुद्दांवर बोट ठेवले. वाढीव एफएसआय मंजूर करताना शहरातील नागरिकांच्या क्रयशक्तीचा विचार करुनच अतिरिक्त बांधकामाला दर लागू करावेत, अशा सूचना केल्या. दरम्यान जिल्हाधिकारी गित्ते यांनी कोल्हापूर महापालिकेने एफएसआय लागू केल्याने उत्पन्नात १०० ते १२० कोटींची वाढ झाल्याचे उदाहरण दिले. परंतु नवीन एफएसआय लागू करताना दर निश्चत करणे आवश्यक असल्याचे सदस्यांचे म्हणणे होते. वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय नियमावली लागू करताना रेडिरेकनर नुसार दर आकारले जात असतील तर ही बाब नागरिकांवर अन्यायकारक असल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण हरमकर यांनी सांगितले. दरम्यान सोलापूरच्या धर्तीवर एफएसआय लागू करताना काही तज्ज्ञांचे अभिप्राय मागवूनच पुढील निर्णय घ्यावा, असा सूर सदस्यांनी लावून धरला. परिणामी महापौर नंदा यांनी याविषयावर लवकरच गटनेता, विरोधीपक्षनेता, बांधकाम व्यावसायिक, वास्तुशिल्पकार, तज्ज्ञांची बैठक घेण्याचे ठरविले. पुढील महिन्यात विशेष सभा घेऊन वाढीव एफएसआय मंजूर केला जाईल, असा निर्णय ही सभा स्थगित करताना घेण्यात आला. (प्रतिनिधी)