शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

अतिरिक्त बांधकाम ‘सीएम’च्या दरबारात

By admin | Updated: October 20, 2015 00:28 IST

महानगरातील अतिरिक्त बांधकामाबाबत धोरण निश्चितीचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारात १५ दिवसांत नेला जाईल, असा निर्णय आ. सुनील देशमुख यांनी सोमवारीे घेतला.

दोन तास चर्चा : सुनील देशमुखांची महापालिकेत आढावा बैठकअमरावती : महानगरातील अतिरिक्त बांधकामाबाबत धोरण निश्चितीचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारात १५ दिवसांत नेला जाईल, असा निर्णय आ. सुनील देशमुख यांनी सोमवारीे घेतला. विकास कामांबाबत आढावा घेताना अतिरिक्त बांधकामांबाबत आयुक्तांच्या कामकाजावर देशमुखांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले.महापालिकेत आढावा बैठकीला पक्षनेता बबलू शेखावत, सभापती विलास इंगोले, आयुक्त चंद्रकांत गुडेवार, प्रवीण हरमकर, प्रकाश बनसोड, संजय अग्रवाल, तुषार भारतीय, दिंगबर डहाके, प्रदीप दंदे, माजी महापौर मिलिंद चिमोटे, बाळासाहेब भुयार, प्रशांत वानखडे, जावेद मेमन, अजय गोंडाने आदी उपस्थित होते. यावेळी स्मार्ट सिटी उपक्रम, रमाई आवास योजना, वैयक्तिक नळ जोडणी व शौचालय योजना, शहर परिवहन सेवा, मालमत्ता कर वसुली आदी विषयांवर मंथन करण्यात आले. मात्र अतिरिक्त बांधकाम प्रकरणी विशेष व्यक्तिंना लक्ष्य करुन कारवाई होत असल्याचा मुद्यावर आ. देशमुखांनी प्रशासनाला निरुत्तर केले. यावेळी माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी एफएसआय बाबत धोरण निश्चित केले नसताना कारवाई करता येत नाही, ही बाब आवर्जून मांडली, हे विशेष.६० लाखांसाठी ४० लाखांचा खर्चशहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी काही दिवसांपूर्वी तांत्रिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य घेण्यात आले. या सर्वेक्षणांवर ४० लाख रुपये महापालिकेने खर्च केलेत. मात्र मालमत्ता करापोटी केवळ ६० लाख रुपये वसूल झाल्याची आकडेवारी या बैठकीत स्पष्ट झाली.महापौरांसह राष्ट्रवादीचे सदस्य अनुपस्थितआ. सुनील देशमुख हे बैठकीसाठी महापालिकेत आले असता महापौर चरणजित कौर नंदा, गटनेता अविनाश मार्डीकर आदी राष्ट्रवादीचे सदस्य अनुपस्थित असल्याचे दिसून आले. काँग्रेस, भाजप, शिवसेना, रिपाइं आदींनी या बैठकीत हजेरी लावली. मात्र राष्ट्रवादी फ्रंटचे सदस्य गैरहजर राहण्यामागे राजकारण असल्याची चर्चा आहे.