शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणात कुणबी समाजाला समाविष्ट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:59 IST

मराठा आरक्षणात कुणबी जातीलाही सामाविष्ट करावे, अशी मागणी शनिवारी पत्रपरिषदेत सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजाला आरक्षण देणाºया राज्य सरकारचे आभार मानले.

ठळक मुद्देपत्रपरिषद । सकल मराठा समाजाची मागणी, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मराठा आरक्षणात कुणबी जातीलाही सामाविष्ट करावे, अशी मागणी शनिवारी पत्रपरिषदेत सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजाला आरक्षण देणाºया राज्य सरकारचे आभार मानले.९ आॅगस्ट २०१६ रोजी मराठा क्रांती मूक मोर्चाची सुरुवात झाली आणि महाराष्ट्रासह देशात विविध ठिकाणी मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले. त्याची फलश्रुती म्हणून शासन निर्णय न्यायालयात कायम राहत मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत अनुक्रमे १३ आणि १२ टक्के आरक्षण मिळाल्याचे नितीन देशमुख म्हणाले. मराठा हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. हे सिद्ध झाल्याने जवळपास साडेचार कोटी समाजबांधवांना आरक्षण मिळाले. यात राज्य मागास आयोगाने महत्त्वाची भूमिका बजावली. यापूर्वी मंडळ आयोग, राष्ट्रीय मागास आयोग, खत्री आयोग आणि बापट आयोगाला जे जमले नाही ते काम एम.जी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सफल झाल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक नितीन पवित्रकार यांनी सांगितले. यामध्ये जे पुरावे त्यांनी गोळा केले, त्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कुणबी आणि मराठा समाज एकच आहे. यामध्ये कुणबी आणि मराठा असलेल्या परिवाराच्या रोटी-बेटीचे व्यवहार आहेत. हेसुद्धा आयोगाने स्पष्ट केले. याचाच अर्थ कुणबी व मराठा यात भेद नाही. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या सांगण्यावरून विदर्भातील मराठा समाज आपल्या कागतपत्रात कुणबी लिहू लागल्याने त्याला उर्वरित महाराष्ट्रातील मराठा समाजासारखा संघर्ष करावा लागला नाही. कुणबी समाजाला आरक्षण हेदेखील मंडल आयोगानुसार मिळाले, त्यापूर्वी बिगर आरक्षित होता.आता शासनाने मराठा समाजाला आरक्षण देऊन आणि न्यायालयात योग्य बाजू मांडून त्याच आनुषंगाने कुणबी घटकाला मराठा आरक्षणाच्या प्रवर्गात आणावे, अशी मागणी सकल मराठा समाज अमरावती यांच्यावतीने करण्यात येत आहे. यासंदर्भात लवकरच मुख्ंयमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी सुरेश धोटे, नितीन देशमुख, बंडोपंत भुयार, छाया देशमुख, स्वप्निल धोेटे, अमोल देशमुख रुपेश सवाई,महेश तºहाळ, राजेंद्र ठाकरे, विशाल पवार, स्वराज ठाकरे, नितीन धर्माळे, राहूल इंगळे, आकाश वडतकर, रोशन घोरमाडे, अंकुश डहाणे, भुषण काळे वैभव देशमुख, गिरीश सोळंके, राजू पाटील आदी उपस्थित होते.वसतिगृह योजना कुणबी समाजालाही लागू करामराठा क्रांती मोर्चाच्या जवळपास २० मागण्या होत्या. त्यातील शैक्षणिक आणि आर्थिक सुविधा मान्य केल्या. मात्र त्या केवळ मराठा समाजाला लागू केल्याने कुणबी समाज वंचित राहिला. शासनाने मागील काळात निर्गमित केलेले व येत्या काळात जाहीर होणाºया शासन निर्णयात मराठा, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा असा उल्लेख करावा. जेणे करून या योजना विदर्भात चांगल्या पद्धतीने राबविल्या जातील. स्व. संजय बंड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सकल मराठा समाजाच्यावतीने स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्याचे काम सुरु असल्याचे नितीन देशमुख म्हणाले.