शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

१३ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 01:40 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे जिल्हाभरातील १४ पंचायत समितींकडून २५ शिक्षकांनी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आॅनलाईन प्रस्ताव सादर केले. त्यांच्या छाननीनंतर निवड समितीने १३ शिक्षकांच्या निवडीवर शिक्मोर्तब केले. त्यानुसार अंतिम मंजुरीसाठी निवड यादी विभागीय आयुक्त यांच्याकडे शिक्षण विभागाने दोन दिवसांपूर्वी सादर केली होती.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेतर्फे आज गौरव : चौघांचा विशेष सन्मान, विभागीय आयुक्तांची झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणारे सन २०१८-१९ चे जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार ४ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आले. यामध्ये १३ शिक्षकांचा समावेश आहे. चार शिक्षकांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या पुरस्कारप्राप्त शिक्षकांना ५ सप्टेंबर रोजी विमलाबाई देशमुख सभागृहात झेडपीतर्फे गौरविण्यात येतील.जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे जिल्हाभरातील १४ पंचायत समितींकडून २५ शिक्षकांनी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आॅनलाईन प्रस्ताव सादर केले. त्यांच्या छाननीनंतर निवड समितीने १३ शिक्षकांच्या निवडीवर शिक्मोर्तब केले. त्यानुसार अंतिम मंजुरीसाठी निवड यादी विभागीय आयुक्त यांच्याकडे शिक्षण विभागाने दोन दिवसांपूर्वी सादर केली होती.जिल्हा परिषदेच्या १३ आदर्श शिक्षकांच्या पुरस्कार यादीच्या फाईलवर आयुक्तांनी ४ सप्टेंबर रोजी अंतिम शिक्कामोर्तब केले. गतिमान प्रक्रियेमुळे यंदा अनेक वर्षांनंतर आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याला शिक्षकदिनाचा मुहूर्त लाभला आहे.विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी शिक्षकांच्या नावांना मंजुरी प्रदान केल्यानंतर जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैक ी १२ तालुक्यांतून १३ शिक्षकांची सन २०१८-१९ या वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या सर्व शिक्षकांना गुरूवारी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, शिक्षण सभापती जयंत देशमुख यांच्या मान्यवरांच्या हस्ते ५ सप्टेंबर रोजी विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित समारंभात दुपारी ३ वाजता गौरविण्यात येणार आहे.या शिक्षकांना मिळाला बहुमानजिल्हा परिषद शिक्षक विभागाकडून दिला जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार २०१८-१९ चे निवड झालेल्या शिक्षकांमध्ये अनुपमा कोहळे अचलपूर, विलास बाबरे अमरावती, नीलेश उमक अंजनगाव सुर्जी, संदीप धोटे भातकुली, रोहिणी चव्हाण अचलपूर, प्रवीण जावरकर दर्यापूर, विनोद राठोड धामणगाव रेल्वे, रवींद्र घवळे धारणी, सचिन वावरकर चांदूर रेल्वे, नीलेश इंगोले मोर्शी, उमेश शिंदे नांदगाव खंडेश्र्वर,अजय अडीकने तिवसा आणि रमेश चांयदे वरूड या १३ शिक्षकांचा समावेश आहे.या चौघांचा विशेष सन्मानजिल्हा परिषद शिक्षण विभागाने ४ शिक्षकांना विशेष पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये अमरावती तालुक्यातून उल्लेखनीय कार्याबद्दल आशिष पांडे, तर वरूड तालुक्यातून वर्ग व शाळेच्या सर्वांगीण विकासाकरिता विशेष योगदान दिले असल्याने नंदकिशोर पाटील यांना सन्मानित करण्यात येणार आहे. शाळा डिजिटल करण्यासाठी विशेष परिश्रम घेतल्याने धामणगाव रेल्वे तालुक्यातील ज्ञानेश्र्वर राठोड व स्वच्छता अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मोर्शी तालुक्यातून मोहन निंघोट यांचा विशेष गौरव होणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद