पोलीस आयुक्तांचे आदेश : चार खाजगी बसचालकांवर कारवाईचा बडगा अमरावती : खासगी बसेस पंचवटी चौकात शिरताक्षणीच कारवाईचे आदेश पोलीस आयुक्तांनी गुरुवारी गाडगेनगर शहर वाहतूक शाखेच्या पीआय दिगांबर नागे यांना दिले. शुक्रवारी चार खासगी वाहकांवर कारवाई करण्यात आल्याने खासगी बसचालकांचे धाबे दणाणले आहे.शहरातील पंचवटी चौकात नेहमी वाहनांची वर्दळ असते. अमरावती- नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या ठिकाणी हजारो वाहने ये-जा करतात. अनेक खासगी बसेस पंचवटी चौकातून प्रवासी वाहतूक करायची, येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाजवळ वाहनांची अवैध पार्किंग केली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्या पार्श्वभूमिवर 'लोकमत'ने हा प्रश्न लोकदरबारात मांडला होता. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिेक यांनी कारवाईचे आदेश देताच चार खासगी वाहकांवर कारवाई झाली.
खासगी बसेस चौकात शिरत्याक्षणीच कारवाई
By admin | Updated: July 10, 2016 00:05 IST