शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

बेकायदा खाणावळींवर कारवाईसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

शहरात विनापरवाना खाणावळींचे पेव फुटले आहे. खाणावळ चालविणाऱ्या व्यावसायिकांद्वारे शिळे, उष्टे अन्न उघड्यावर टाकण्याचा प्रकार सातत्याने होत असल्याने स्थायी समितीचे सभापती बाळासाहेब भुयार प्रचंड संतापले. पंचवटी ते विमवि परिसरात दुर्गंधीसह नागरिकांच्या आरोग्यासाठी बाधक असलेल्या या प्रकाराबाबत दंडात्मक कारवाईची लिपापोती नव्हे, तर पोलीस ठाण्यात एफआयआरच हवा, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली.

ठळक मुद्देस्थायी समिती सभापती संतापले : एफआयआर हवा, महापालिका आयुक्तांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘एज्युकेशन हब’ अशी ओळख निर्माण झालेल्या अमरावतीत बेकायदा खाणावळींवर कारवाईसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार होत आहे. रस्त्याच्या कडेला शिळे, उष्टे अन्न टाकण्याच्या मुद्द्याकडे स्थायी समिती सभापती बाळासाहेब भुयार यांनी लक्ष वेधल्यावर आयुक्तांकडून ही भूमिका पुढे आली आहे.शहरात विनापरवाना खाणावळींचे पेव फुटले आहे. खाणावळ चालविणाऱ्या व्यावसायिकांद्वारे शिळे, उष्टे अन्न उघड्यावर टाकण्याचा प्रकार सातत्याने होत असल्याने स्थायी समितीचे सभापती बाळासाहेब भुयार प्रचंड संतापले. पंचवटी ते विमवि परिसरात दुर्गंधीसह नागरिकांच्या आरोग्यासाठी बाधक असलेल्या या प्रकाराबाबत दंडात्मक कारवाईची लिपापोती नव्हे, तर पोलीस ठाण्यात एफआयआरच हवा, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली.विनापरवाना सुरू असलेल्या या व्यवसायात ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. मात्र, अन्न व औषध विभागाद्वारे कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे आता गल्लोगल्ली विनापरवाना खाणावळींचे पेव फुटले आहे. या व्यावसायिकांद्वारे रोज पहाटे शिळे, विटलेले अन्न हे रस्त्याच्या कडेला किंवा नालीत टाकण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या अन्नात किडे होत असल्याने मानवी आरोग्यासदेखील ते हानिकारक आहे. महापालिकेकडे अशा बहुतांश व्यावसायिकांची नोंदणी नाही. महापालिकेचे कंटेनर किंवा कचरा पेट्यांमध्ये हे अन्न टाकले जात नाही. या व्यावसायिकांनी रिक्षा सांगून विहित ठिकाणी कचरा टाकल्यास स्वच्छता कर्मचाऱ्यांद्वारे उचलला जाऊ शकते. मात्र, हा प्रकारदेखील या व्यावसायिकांकडून होत नसल्याने बाळासाहेब भुयार प्रचंड संतापले. कित्येकदा यांना सांगून झाले; दुर्गंधी कायम असल्याने पावडर टाकण्यात आली. मात्र, या प्रकारात वाढ होत असल्याने आता दंडात्मक कारवाई नको; एफआयआर दाखल करा, अशी सूचना भुयार यांनी आयुक्तांसह वैद्यकीय आरोग्य अधिकाºयांना केली.स्थायी समिती सभापती बाळासाहेब भुयार यांनी सोमवारी गाडगेनगर प्रभागात पाहणी केली असता, राधानगरातील इंदिरा स्कूल, पलाश लेन, राधाकृष्ण मंदिर, तुकडोजी महाराज मंदिर आदी ठिकाणी उघड्यावर खाणावळधारकांनी शिळे अन्न टाकल्याचे दिसून आले.अजय सारसकरांनीही धरले धारेवरहॉटेलमधील व खाणावळीचे उष्टान्न उघड्यावर टाकण्यात येत असल्याचा मुद्दा आमसभेत चर्चिला जाताच स्थायी समितीचे सभापती बाळासाहेब भुयार व शहर सुधार समितीचे सभापती अजय सारसकर यांनी आरोग्य विभाग व बाजार परवाना विभागाला धारेवर धरले. यामध्ये आयुक्तांनी निर्देश द्यावेत, अशी मागणी केली. यावर आयुक्त संजय निपाणे यांनी आरोग्य विभागाला याविषयी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करायला सांगितले आहे. त्यानुसार आता कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.परवाना नसल्यास ५० हजार ते २ लाखांपर्यंत दंडखाणावळ व्यवसायाची महापालिकेत व अन्न व औषधी प्रशासनाचा परवाना असणे बंधनकारक आहे. खाणावळीचे वार्षिक उलाढाल १२ लाखांवर असल्यास वार्षिक दोन हजार, या निकषाच्या आत असल्यास वार्षिक १०० रुपये शुल्काची आकारणी करण्यात येते. हा परवाना नसला, तर एफडीएद्वारे कारवाई करण्यात येते. यामध्ये दंडाची रक्कम ५० हजार ते २ लाखांपर्यत राहू शकते. याव्यतिरिक्त महापालिकेनेही स्वच्छता राखावी, यासाठी काही नियम लागू केले आहेत. मात्र, या नियमांचे उल्लंघन होत असल्याने आता महापालिकेने दंडात्मक कारवाई नको; एफआयआर नोंदवावा, अशी भुयार यांची मागणी आहे.कायद्याचे अस्तित्व आहे काय?अन्न व औषधांचे प्रमाणीकरण करून त्यांची निर्मिती, विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र शासनाने अन्न व भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ अंमलात आणला. या कायद्यातील त्रुटी घालवून ५ ऑगस्ट २०११ पासून ‘अन्न व सुरक्षा कायदा’ लागू करण्यात आला. तरीही काहीही बदल झालेला नाही. शहरातील बहुतांश हॉटेल, खाणावळ, उपाहारगृह व टपरींची या कायद्यांतर्गत नोंदणीच झालेली नाही. महापालिकेच्या बाजार व परवाना विभागाने नोंदणीसाठी पुढाकार घेतला नसल्याचेही याद्वारे स्पष्ट आहे. विशेष म्हणजे, दोन्ही विभागांद्वारे याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आता उपद्रव वाढला आहे.

टॅग्स :Socialसामाजिक