शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच छायाचित्रणात काठेवाडी गुरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:01 IST

चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत चिरोडी वनक्षेत्रात अवैध चराई रोखण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. चिरोडी वनवर्तुळातील दक्षिण चिरोडी बीटमधील वनखंड क्रमांक ३०५ मध्ये अवैध चराईची माहिती चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांना मिळाली. त्यांनी चिरोडी वर्तुळातील वनकर्मचाऱ्यांसह सापळा रचून दक्षिण चिरोडी बीटमध्ये अवैधरीत्या चराई करणाऱ्या गुरांवर छापा मारला.

ठळक मुद्देदोन गुराख्यांना अटक : चांदूर रेल्वे आरएफओंची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कपोहराबंदी : चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून काठेवाडी गुरांची वनक्षेत्रात चराई केल्याप्रकरणी दोन पशुमालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना वनकोठडी सुनावली. यादरम्यान त्यांच्याकडून झालेल्या वनचराईचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले आहे.चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत चिरोडी वनक्षेत्रात अवैध चराई रोखण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. चिरोडी वनवर्तुळातील दक्षिण चिरोडी बीटमधील वनखंड क्रमांक ३०५ मध्ये अवैध चराईची माहिती चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांना मिळाली. त्यांनी चिरोडी वर्तुळातील वनकर्मचाऱ्यांसह सापळा रचून दक्षिण चिरोडी बीटमध्ये अवैधरीत्या चराई करणाऱ्या गुरांवर छापा मारला. छापा मारताच वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांचे पथक पाहून यावेळी अवैध चराई करणारे जवळपास २०० ते ३०० गुरे पळवून नेण्यात गुराखी यशस्वी झाले. दरम्यान, आरोपी लक्ष्मण खेंगार बोडिया व देवकन जयसिंग मिर यांना घटनास्थळी पकडण्यात आले. ही कारवाई उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी आरोपींना ताब्यात घेऊन पुढील प्रकरण न्यायालयाकडे सोपविले. ‘लोकमत’ने काठेवाडी गुरांच्या अवैध चराईचे प्रकरण लावून धरले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.कारवाईदरम्यान व्हिडीओ-शूटिंगराखीव वन आणि अतिसंरक्षित वनक्षेत्रात काठेवाडी गुरे आढळल्यास आता व्हिडीओ शूटिंगद्वारे कारवाई केली जाणार आहे. अवैध चराईचे छायाचित्रण घेतले जाईल. त्यानंतर पशुमालकांवर वनसंवर्धन अधिनियमानुसार कारवाई करून पुढील प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात येईल. चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या नेतृत्वात वनपाल, वनरक्षक, वनमजूर अशी फळी अवैध चराई रोखण्यासाठी कामाला लागली आहे.चांदूर रेल्वे वनविभागाची कारवाईचिरोडी वर्तुळातील दक्षिण चिरोडी बीट वनखंड क्रमांक ३०५ या वनक्षेत्रालगत राहुट्या करून राहणाºया पशुमालकांवर अवैध चराईप्रकरणी वनगुन्हा दाखल करण्यात आला. त्यांमध्ये आरोपी लक्ष्मण खेंगार बोडिया, मानावेन देवगर मिर, मनुबेन विठ्ठल मिर, हिराबेन देवा बोडिया, देवा भुरा बोडिया, मदन खेंगार बोडिया, देवकन जयसिंग मिर, माला देवकन मिर यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१)(ड)(फ), (ह)(१-अ) अ २०१४ मधील नियम १३ अन्वये वनगुन्हा क्रमांक १८/११ जारी करून यापैकी दोघांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने वनकोठडी सुनावली आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग