शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उपविभागीय अभियत्यांने घेतली ३० हजारांची लाच; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

By प्रदीप भाकरे | Updated: October 6, 2022 19:17 IST

उपविभागीय अभियत्यांने ३० हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. 

अमरावती : कामांचे देयक मंजूर करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या दर्यापूर येथील उपविभागीय अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई गुरुवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता यांच्या दालनात करण्यात आली. तेजकुमार वसंतराव येवले (५७) असे अटक करण्यात आलेल्या उपविभागीय अभियंत्याचे नाव आहे.

एसीबीनुसार, तक्रारदाराच्या कंत्राटदार मुलाने जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, दर्यापूर अंतर्गत नांदरून येथील सामाजिक सभागृह आणि नाचोना येथील रस्ता डांबरीकरणाचे काम केले. या दोन्ही कामांचे १६ लाख ८८ हजार ९९९ रुपयांचे देयक मंजूर करण्यासाठी दर्यापूर येथील उपविभागीय अभियंता तेजकुमार येवले यांनी त्यांच्याकडे ५५ हजारांच्या लाचेची मागणी केली. पहिला हप्ता म्हणून ३० हजार रुपये मागितले. यासंदर्भात कंत्राटदारांच्या वडिलांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती घटकाकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने पडताळणी केली.

दालनातच ट्रॅपलाचेची मागणी निष्पन्न झाल्याने एसीबीने गुरुवारी दुपारी जिल्हा परिषदेत कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालय परिसरात सापळा रचला. कंत्राटदाराकडून ३० हजारांची लाच स्वीकारताच एसीबीने उपविभागीय अभियंता तेजकुमार येवले याला अटक केली. या प्रकरणी तेजकुमार येवले याच्याविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक केतन मांजरे व अमोल कडू, विनोद कुंजाम, रोशन खंडारे, शैलेश कडू, सतीश किटुकले आदींनी केली.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी