शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्याच्या कुख्यात गुंडाविरूध्द एमपीडीएद्वारे कारवाई

By प्रदीप भाकरे | Updated: March 1, 2023 18:31 IST

अमरावती : परतवाडा येथील कुख्यात गुंड पवन उर्फ पैदल शिशुपाल परिवाले (२९, कांडली) याच्याविरूध्द एमपीडीए अन्वये कारवाई करून त्याला ...

अमरावती: परतवाडा येथील कुख्यात गुंड पवन उर्फ पैदल शिशुपाल परिवाले (२९, कांडली) याच्याविरूध्द एमपीडीए अन्वये कारवाई करून त्याला एक वर्षांकरिता जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले. १ मार्च रोजी ‘पैदल’ ला पकडून जेलमध्ये टाकण्याची कार्यवाही करण्यात आली.

आरोपी पैदल परिवालेविरूध्द खून, दंगा व अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापुर्वी देखील तडीपारी व स्थानबध्दतेची कार्यवाही करण्यात आली. मात्र कारागृहातून बाहेर पडल्यानंतरही त्याने गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे पाठविला. त्याला हिरवी झेंडी मिळाल्यानंतर तो आदेश १ मार्च रोजी तामिल करण्यात आला. ही कार्यवाही पुर्ण करण्यासाठी एसपी बारगळ, अपर पोलीस अधीक्षक शशीकांत सातव, स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात उपनिरिक्षक आशिष शिंदे, अंमलदार अमोल देशमुख, अमित वानखडे यांच्यासह परतवाड्याचे ठाणेदार संदीप चव्हान यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Amravatiअमरावती