लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात कार सजावटीची अनेकांनी दुकाने थाटली असून, तेथून वाहनांच्या काचांना बंदी असलेली काळी फिल्म सर्रास लावून दिली जात आहे. याविरुद्ध आरटीओने मोहीम उघडली आहे.काळी फिल्म लावलेल्या वाहनांवर विभागीय क्रीडा संकुलानजिक आरटीओ पथकाने गुरुवारी दुपारी कारवाई केली. प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गीते यांच्या मार्गदर्शनाखाली आरटीओचे मोटर वाहन निरीक्षक हितेश दावडा, सहायक मोटरवाहन निरीक्षक अविनाश पाटील यांच्या पथकाने थेट कार सजावटीच्या दुकानांपुढेच ही कारवाई केली. संबंधित वानचालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात पाचारण करून सविस्तर चौकशी केली जाईल. ही मोहीम आता नियमिती राबविली जाणार असल्याची माहिती आहे.चारचाकी वाहनांच्या काचांना काळी फिल्म लावणे नियमबाह्य असल्यामुळे कार सजावटींच्या दुकानातून वाहनांना सन कंट्रांल फिल्म लावू नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी वाहनचालकांना केले आहे. बहुदा सुशिक्षित लोक कार खरेदी करतात.फिल्म लावून नियमांचे उल्लंघनही तेच करतात. त्यामुळे कारवाईचा बडगाउगारणे आवश्यक झाल्याचे अधिकारी म्हणाले.
काळी फिल्म लावणाऱ्या वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 22:52 IST
शहरात कार सजावटीची अनेकांनी दुकाने थाटली असून, तेथून वाहनांच्या काचांना बंदी असलेली काळी फिल्म सर्रास लावून दिली जात आहे. याविरुद्ध आरटीओने मोहीम उघडली आहे.
काळी फिल्म लावणाऱ्या वाहनांवर कारवाई
ठळक मुद्देवाहनचालकांना मेमो : फिल्म न लावण्याचे आवाहन