शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रेती वाहतुकीच्या ११ ट्रकवर कारवाई

By admin | Updated: April 11, 2015 00:17 IST

तालुक्यात अवैध खनिज तसेच रेती वाहतुकीचा सुळसुळाट असल्याचे कित्येक दिवसांपासून दिसून येत आहे..

रेती तस्करांमध्ये खळबळ : चांदूर उपविभागाचे मात्र दुर्लक्षचांदूररेल्वे : तालुक्यात अवैध खनिज तसेच रेती वाहतुकीचा सुळसुळाट असल्याचे कित्येक दिवसांपासून दिसून येत आहे. गुरुवारी अमरावती आरटीओने तब्बल १८ अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकांवर कारवाई करीत ते चांदूररेल्वे स्टेशनला जमा केले. असे असताना चांदूररेल्वे उपविभागाचे मात्र या रेती वाहतुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याची चर्चा होत आहे. एमएच २७ एक्स ४९६४, एमएच ३४ एएम ७७७३, पीजी १५ अ‍े ४५५६, एमएच २७ अ‍े ४४८४, एमएच ३१ पीबी १६४, एमएच २७ एक्स ४०२१, एमएच ०४ पीजी ७२३६, एमएच ३१ अ‍ेपी ४६१५, एमटीव्ही २८१३, एमडब्ल्यूवाय २६५७, एमएच २९-७९१३ असे कारवाई होत असलेल्या ट्रकांचे नंबर असून बाभुळगावहून येताना चांदूर-अमरावती बायपासवर अमरावती पोलिसांनी ही कारवाई केली. महिनाभरापासून तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत आहे व त्यामुळे तालुक्यातील अनेक मोठे रस्ते खराबही होत आहेत. एवढेच नव्हे तर आ. जगताप यांनी हा प्रश्न सभागृहात मांडला. परंतु चांदूर महसूल विभाग व पोलीस विभाग याकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र आहे. अधून-मधून मोठी कारवाई करण्याचा आव पोलीस आणत असून प्रत्यक्षात कारवाई मात्र अत्यल्प असते, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)प्रत्येकी १२ हजारांचा दंडश्पकडलेल्या रेती ट्रकांवर तहसील कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली असून प्रत्येकी १२ हजार ४०० इतका दंड आकारण्यात आला. त्यातील ३ ट्रकमालकांनी गुरुवारी दंड भरला असून इतर ट्रक मालकही दंड भरणार असल्याचे उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे यांनी सांगितले. पोलिसांच्या आपसी मतभेदामुळे सापडले ट्रकरेती ट्रकमालक व पोलिसांचे साटेलोट असतात, ही बाब सर्वांनाच माहीत असली तरी पोलिसांच्या आपसी मतभेदामुळे गुरुवारी ट्रक पकडला गेल्याची चर्चा काही ट्रक चालक तसेच पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये ऐकायला मिळाली. रेती माफियांकडून मिळालेला हप्ता शेवटच्या पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचत नसल्याने नाराज पोलीस कर्मचारीच वरिष्ठांना माहिती पुरवून हे अवैध रेती ट्रक पकडून देतात, अशा चर्चेला परिसरात पेव फुटले आहे.