शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

विमानतळ विस्तारीकरणाला ग्रहण

By admin | Updated: September 15, 2015 00:05 IST

बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण, विकासासाठीचा मंजूर निधी चंद्रपूर विमानतळासाठी पळविण्यात आला आहे.

निधी चंद्रपूरकडे वळविला : लोकप्रतिनिधींचे प्रयत्न कमी पडल्याचा सूर, ‘टेक आॅफ’चे स्वप्न भंगणार?अमरावती : बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण, विकासासाठीचा मंजूर निधी चंद्रपूर विमानतळासाठी पळविण्यात आला आहे. त्यामुळे अमरावतीत विमान ‘टेक आॅफ’चे स्वप्न बघणाऱ्यांचा भ्रमनिरास झाला असून विमानतळ विस्तारीकरणाला ‘ब्रेक’ लागला आहे. दुसरीकडे निधी खेचून आणण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे प्रयत्न कमी पडल्याचा सूर उमटू लागला आहे.नागपूर येथे काही महिन्यांपूर्वी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री प्रवीण पोटे, आ.सुनील देशमुख, आ.रवी राणा, आ. वीरेंद्र जगताप, आ.यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणावर चर्चा झाली होती. यावेळी भारतीय विमानतळ प्राधिकरण कंपनी आॅफ इंडियाचे सिध्देश्वर राय यांनी बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण अशक्य असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, तरीही बेलोरा विमानतळाचा विकास करताना यवतमाळ ते अकोला महामार्गालगतचा ४ कि.मी.वळणरस्ता, वीजपुरवठा, पाणी व्यवस्था, समोरचा रस्ता आणि ‘रन-वे’च्या निर्मितीसाठी राज्य शासनाद्वारे मंजूर ३४ कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते. ही कामे झाल्यास बेलोरा विमानतळावरुन आठवड्यातून तीन ते चार दिवस ५० आसनक्षमतेची विमानसेवा सुरू करता येईल, यावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र अर्थसंकल्पात निधीची तरतूद केल्यानंतरही हक्काचा निधी पाठविला गेला नाही. बेलोरा विमानतळाच्या विकासाचा प्रश्न फार जुना असताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर विमानतळासाठी नव्याने ५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. बेलोऱ्याच्या विकासाचे पैसे चंद्रपूरकडे वळते झाल्याने आता बेलोऱ्याचे विस्तारीकरण होणार की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे. चंद्रपूर, यवतमाळ, अकोला व बेलोरा या विमानतळांचा विकास करण्याचे शासनाने ठरविले आहे. बेलोरा विमानतळाचा निधी मंजूर आहे. हा निधी पळविला नाही. मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या नैराश्याने काम रखडले आहे. - प्रवीण पोटे,पालकमंत्री, अमरावती.बेलोरा विमानतळासाठी ३४ कोटी रुपये मंजूर आहेत. निधी पळविण्याचा प्रकार नाही. महाराष्ट्र विमानतळ कंपनीचे अतिरिक्त सचिव पी. एस. मीना मंजूर निधी वळता करीत नाहीत. त्यामुळे विस्तारीकरण रखडले आहे.- सुनील देशमुख,आमदार, अमरावती.केंद्र आणि राज्य शासनापैकी निधी कोणी द्यायचा, यावर एकमत नाही. जमीन अधिग्रहणाचा विषय यापूर्वीच निकाली काढला आहे. शासन धोरणात्मक निर्णय घेत नाही. निधी मिळाल्यास विमानतळाचे काम सुरू होईल.- वीरेंद्र जगताप,आमदार, धामणगाव रेल्वे.