शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पालकाने स्वखर्चाने टाकला मुरुम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : पार्वतीनगरातील रस्त्यांची दुर्दशा अत्यंत बिकट झाली असून, या रस्त्यांवरून नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. ...

ठळक मुद्देपार्वतीनगरात रस्त्यांची दुर्दशा : महापालिका केव्हा देणार लक्ष?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पार्वतीनगरातील रस्त्यांची दुर्दशा अत्यंत बिकट झाली असून, या रस्त्यांवरून नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. शाळकरी मुलांना शाळेत पोहचविताना पालकांची दमछाक होते. वारंवार नगरसेवकांकडे विनंती करून थकलेल्या एका पालकाने चक्क स्वखर्चाने रस्त्यावर मुरूम टाकून आपल्या पाल्याच्या शाळेचा मार्ग दुचाकी जाईल इतपत सुकर केला आहे.पावसामुळे शहरातील अनेक खडतर रस्ते चिखलमय झाल्यामुळे त्यावर चालण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पार्वतीनगरातील रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकालाच वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. त्यातच पार्वतीनगरातील मार्गावर काही शाळा आहेत. शिवलीला मंगल कार्यालयाकडे जाणाºया रस्ता अत्यंत खडतर व मातीमय झाला आहे. त्यामुळे स्कूल व्हॅनचालक मुलांना शाळेत पोहचवून देण्यासाठी आनाकानी करू लागले आहेत. त्यामुळे मुले शाळेतही गैरहजर राहत आहेत. अखेर पालकांवरच मुलांना शाळेत सोडून देण्याची वेळ आली आहे. मात्र, रस्ते इतके खराब आहेत की, त्यावरून दुचाकी नेण्यासही मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर मुरुम टाकण्यांबाबत पालकांनी अनेकदा गडगडेश्वर प्रभागातील नगरसेवकांना सांगितले. मात्र, नगरसेवकांनी निगरगट्ट भूमिका घेतली. त्यामुळे अखेर राठोड नामक पालकाने स्वखर्चाने ट्रकभर मुरुम आणून रस्त्यावर टाकला. त्यामुळे आता त्या रस्त्यावरून दुचाकी जाईल, इतकी व्यवस्था झाली आहे. मात्र, अद्याप महापालिका प्रशासन व नगरसेवकांना जाग आलेली नाही. नागरिकांना रात्रीच्या वेळी याच रस्त्यावरून जावे लागत असून, अंधारात कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Schoolशाळाroad safetyरस्ते सुरक्षा