सुरभी विहारजवळील घटना : आरोपी परतवाड्याचाअमरावती : पत्नीच्या अंगावर 'डायलुट अॅसिड'चा स्प्रे मारल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६.१० वाजतादरम्यान सुरभी विहारात घडली. सुशील नितीन कुऱ्हेकर (२५, रा. परतवाडा) असे आरोपी पतीचे नाव आहे. सुरभी विहारातील रहिवासी एका १९ वर्षीय मुलीचा परतवाडा येथील सुशील कुऱ्हेकर याच्याशी विवाह झाला. लग्नाच्या काही दिवसांनंतर सुशील कुऱ्हेकर याने पीडिताला त्रास देऊन छळ सुरु केले होते. त्यामुळे पीडिता पुन्हा सुरभी कॉलनीत माहेरी परत आली होती. शुक्रवारी सकाळी पीडित विवाहिता शिकवणीकरिता जात असताना आरोपी पती सुशीलने तिला मार्गात गाठून अंगावर 'डायलूट अॅसिड'चा स्प्रे मारला, अशी तक्रार पीडिताने गाडगेनगर पोलीस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी आरोपी पतीविरूध्द भादंविच्या कलम ३२६ अन्वये गुन्हा नोंदविल्याची माहिती पोलीस निरीक्षक के.एम. पुंडकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
पत्नीच्या अंगावर फवारला ‘अॅसिड स्पे्र’
By admin | Updated: October 17, 2015 00:22 IST