शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूरचे कोविड रुग्णालय नावापुरतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 05:00 IST

कोविड-१९ च्या अनुषंगाने स्थानिक कुटीर रुग्णालयात ३५ बेडचे डेडिकेटेड कोविड रुग्णालय आणि ट्रामा केअर युनिटमध्ये १० बेडचे कोविड आयसीयू बेड व ऑक्सिजनचे पाच बेड असे १५ बेड पाच महिन्यांपूर्वी लावले गेलेत. पण ट्रामा केअरमधील ते कोविड आयसीयू बेड व ऑक्सिजन बेड मागील पाच महिन्यांपासून धूळ खात पडले आहेत. कोरोना संक्रमितांकरिता ते उपलब्ध नाहीत.

ठळक मुद्देना साधनसामग्री, ना सुविधा : केवळ प्रसिद्धीचा हव्यास, कोरोनाग्रस्तांच्या उपचाराकरिता खासगी डॉक्टर धजावेना

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : स्थानिक कुटीर रुग्णालयासह ट्रामा केअर युनिटमध्ये उभारलेले डेडिकेटेड कोविड रुग्णालय आणि अतिदक्षता विभाग (आयसीयू) केवळ नावालाच आहे. आवश्यक डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह ऑक्सिजन व औषधांअभावी कोरोना संक्रमितांची तेथे हेळसांड होत आहे. अद्ययावत उपचारांपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे.कोविड-१९ च्या अनुषंगाने स्थानिक कुटीर रुग्णालयात ३५ बेडचे डेडिकेटेड कोविड रुग्णालय आणि ट्रामा केअर युनिटमध्ये १० बेडचे कोविड आयसीयू बेड व ऑक्सिजनचे पाच बेड असे १५ बेड पाच महिन्यांपूर्वी लावले गेलेत. पण ट्रामा केअरमधील ते कोविड आयसीयू बेड व ऑक्सिजन बेड मागील पाच महिन्यांपासून धूळ खात पडले आहेत. कोरोना संक्रमितांकरिता ते उपलब्ध नाहीत. अचलपूर-परतवाड्यासह अचलपूर तालुक्यात कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज नवे रुग्ण निघत आहेत. शहरासह अख्खा तालुकाच हॉटस्पॉट बनला आहे. कोरोना संक्रमितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातही कोविड-१९ विषाणूने ग्रासलेले रुग्ण आढळून येत आहेत. मेळघाटात सुरुवातीला कोरोनाचा गंधही नव्हता. मात्र, आता संक्रमितांची संख्या वाढतीवर आहे.अशातच कोरोना संक्रमितांच्या उपचाराकरिता ५० बेड सज्ज असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. परंतु, यातील ट्रामाकेअर मधील १५ बेड कुलूपबंद आहेत. उर्वरित ३५ बेडकरिता दाखल कोरोना संक्रमित रुग्णांपैकी काहींना सरळ अमरावतीला पाठविले जात आहे, तर काही रुग्ण तेथील व्यवस्था व उपचार पद्धती बघून स्वत:हून इतरत्र खासगीत पळ काढत आहेत. काही रुग्ण परस्पर बाहेरूनच इतरत्र पळत आहेत. यात इतरत्र बाहेरही त्यांना तात्काळ बेड उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे आरोग्य अधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.रूग्णालयात नव्याने २०० बेडकुटीर आणि ट्रामा केअरमधील ५० बेडलाच आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, स्टाफ, औषधी व व्यवस्थेसह यंत्रणा अपूरी पडत आहे. अशातच अमरावती रोडवरील महालक्ष्मी मंगल कार्यालयात दोनशे बेडची व्यवस्था करण्याचे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.खासगी रुग्णालय नाहीअचलपूर-परतवाड्यात अनेक तज्ज्ञ खासगी डॉक्टर आहेत. पण, कोरोना संक्रमित रुग्णांवर ते उपचार करायला तयार नाहीत. जुळ्या नगरीत कोरोना संक्रमितांकरिता एकही खासगी रुग्णालय नाही.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याhospitalहॉस्पिटल